ए आर रहमान लवकरच पुणे गाजवणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020
  • या कार्यक्रमाचे आयोजक आणि एक्सेलेन्सिया इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी चे संचालक मनीष लांजेकर यांनी प्रेक्षकांच्यासाठी उत्तम अशी असं व्यवस्था केली असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पेटीएम सारख्या संस्थेकडून तिकीटवाटपाची व्यवस्था केली आहे.
  • पेटीएम हा या लाइव कॉन्सर्टसाठी इन्सायडर पार्टनर आहे. 

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे संगीतकार ए आर रहमान हे लवकरच पुणेकरांच्या भेटीला येणार असून येत्या २२ फेब्रुवारीला ए आर रहमान हे प्रथमच पुण्यात लाइव कॉन्सर्ट करणार आहेत. रहमान सोबत यावेळेस नीती मोहन, प्रख्यात संगीतकार उदित नारायण यांचे चिरंजीव आदित्य नारायण हे देखील पुणेकरांचे मनोरंजन करताना दिसतील.

या कार्यक्रमाचे आयोजक आणि एक्सेलेन्सिया इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी चे संचालक मनीष लांजेकर यांनी प्रेक्षकांच्यासाठी उत्तम अशी आसन व्यवस्था केली असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पेटीएम सारख्या संस्थेकडून तिकीटवाटपाची व्यवस्था केली आहे. पेटीएम हा या लाइव कॉन्सर्टसाठी इन्सायडर पार्टनर आहे. 

या कार्यक्रमाची तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांना मात्र चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार अस दिसतय कारण या कार्यक्रमाची  ११ जानेवारीला तिकीटविक्री सुरु होणार असून १२ तारखेपर्यंत तिकीट विक्रीचा स्लॉट सुरु राहणार आहे .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News