जगाला आयुष्य जगायला शिकवणारा ए. आर रहमान करणार होता आत्महत्या, का ते पहा...

सुरज पाटील (यिनबझ)
Wednesday, 1 May 2019

ए.आर रहमानला संगीतासाठी देशात आणि जगभरात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्जनशील कलावंत मानाचा ऑस्कर पुरस्कारही त्याला मिळाला आहे. 

आंतरराष्ट्रीय किर्तीचा दमदार संगीतकार म्हणजे ए. आर रहमान. त्याने तयार केलेले हर एक संगीत प्रत्येक तरुण-तरुणींना तरी भूरळ पाडत आहेच, पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे लहान  मुलांपासून सत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्या मानसांच्या मनातही ए. आरने आपली जागा बळकट केली आहे.

येवढा मोठा, सुप्रसिध्द गीतकार, संगीतकार आणि एक उत्तम आदर्श असलेला व्यक्ती म्हणून नावारुपाला आलेल्या ए.आर रहमानच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता, ज्यामुळे तो आत्महत्या करण्यासदेखील प्रवृत्त झाला होता. यामागे नेमके काय कारण होतं, त्याचाच आढावा आपण घेणार आहोत...

ए. आर रहमानला संगीतासाठी देशात आणि जगभरात अनेक पुरस्कार जिंकले आहेत. सर्जनशील कलावंत मानाचा ऑस्कर पुरस्कारही त्याला मिळाला आहे. 

रहमानच्या आयुष्यात कधीकाळी एक वेगळा काळ आला होता, ज्यामुळे त्याने आयुष्य संपवायचा निर्णय देखील घेतला होता. एका विशिष्ट वयात त्याच्या मनात नैराश्याने घर केले होते.

रहमानच्या करिअरच्या सुरुवातीला यश न मिळाल्याने त्याच्यावर नैराश्य ओढवले होते. या सर्व अपयशामुळे माझ्या मनात प्रत्येक दिवशी टोकाची भूमिका घेण्याचे निर्णय माझ्या मनात येत होते. परंतू त्यामुळे मला आयुष्यात संकटांवर वर्चस्व करण्याची ताकद मिळाली आणि त्यामुळे मला यश मिळत गेले.

रहमान सांगतो... 
माझे वडील गेल्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, त्यामुळे वयाच्या पंचविशीपर्यंत मी रोज आत्महत्या करण्याचे विचार मनात आणत होतो. मला हे जमनार नाही, मी गोष्ट कधीच करु शकणार नाही, अशा अनेक विचारांनी  माझ्या मनात घर करून टाकलं होतं. पण माझ्या मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने त्या विचारांतून मला बाहेर काढलं.

माझे वडील गेल्यानंतर माझे घर सांभाळणे मुश्किल झाले होत.  माझ्यावर संगीताचे साहित्य विकण्याची वेळ आली होती. वडील ज्याप्रकारे काम करायचे त्याप्रकारे मला काम जमत नव्हते, तरी मी मझ्या परिने प्रयत्न केले आणि जे काही आहे, ते तुमच्यासमोर आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News