नोकरी सोडून व्यवसाय करताय? मग हे वाचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

नोकरीसोडल्यानंतर तो व्यवसाय चालेल की नाही, त्याच्यापासून उत्पन्न कधी मिळेल, आपण व्यवसायात यशस्वी होणार किंवा नाही, असे अनेक प्रश्‍न नोकरी सोडून व्यवसाय करण्याचाविचार करणाऱ्यांचे असतात. यासाठी आपण कसे अर्थसज्ज असावे याविषयीचा ऊहापोह.

सध्याच्या तरुण पिढीमध्ये एक मोठा बदल अनुभवायला मिळतोय, तो म्हणजे, या पिढीतील बऱ्याच तरुणांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असे वाटते. मात्र नोकरीसोडल्यानंतर तो व्यवसाय चालेल की नाही, त्याच्यापासून उत्पन्न कधी मिळेल, आपण व्यवसायात यशस्वी होणार किंवा नाही, असे अनेक प्रश्‍न नोकरी सोडून व्यवसाय करण्याचाविचार करणाऱ्यांचे असतात. यासाठी आपण कसे अर्थसज्ज असावे याविषयीचा ऊहापोह.

अक्षय आणि अंकिता जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मुळातच हा प्रश्‍न घेऊन आले की नोकरी सोडून व्यवसाय करणे हा निर्णय घ्यावा की नाही. या प्रश्‍नाचे उत्तर अर्थातच त्यांचा आर्थिक पाया किती मजबूत आहे यावर ठरेल. त्यासाठी आम्ही अक्षय आणि अंकिताचे सगळे आर्थिक तपशील घेतले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

अक्षय आणि अंकिता दोघेही नोकरी करतात.अंकिताची सरकारी नोकरी आहे.
दोघांना सानवी नावाची दोन वर्षांची मुलगी आहे.अक्षयचे वय ३५ वर्षे, तर अंकिताचे वय ३० वर्षे आहे.अक्षय आणि अंकिता वडिलोपार्जित घरामध्ये राहतात.
त्यांच्यावर कुठलेही कर्ज नाही.

अक्षय अंकिताचा जमाखर्चाचा ताळमेळ तक्ता क्रमांक १ मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे. त्यातील आकडे बघितले तर असे लक्षात येईल की-तीन व्यक्तींच्या कुटुंबासाठी दोघांचे मिळून असलेले उत्पन्न चांगले आहे.सध्याचा कुटुंब चालविण्याचा मासिक खर्च जास्त आहे.आतापर्यंत दोघांनी चांगल्या प्रमाणात मासिक गुंतवणूक करून संपत्ती जमा केली आहे.आम्ही अक्षय आणि अंकिताला त्यांच्या जमाखर्चाच्या सवयीमध्ये खालील बदल सुचविले.यापुढे कुटुंबाचा मासिक खर्च कमी करून ४० हजार रुपयांमध्ये भागवावे लागेल. त्यासाठी अंकिता आणि अक्षयने तयारी दाखविली.यासाठी थोडी जीवनशैली बदलावी लागेल आणि अनावश्‍यक खर्च कमी करावे लागतील.कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्‍यक ठरते. यामुळे मासिक खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे.

पुढील काळात सध्यासारखी मासिक बचत होणार नाही, त्यामुळे पुढील तीन वर्षांमधील कुठलीही मोठा पैसा लागणारी उद्दिष्टे बाजूला ठेवावी लागतील.
अक्षयच्या व्यवसायातून उत्पन्न कधी सुरू होईल हे सांगणे कठीण असल्यामुळे कमीत कमी बारा महिन्यांच्या कौटुंबिक खर्चाएवढे पैसे इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढावे लागतील.तक्ता क्रमांक २ मध्ये अक्षय-अंकिताचे संपत्तीचे तपशील दिले आहेत. हा तक्ता बघितल्यानंतर असे लक्षात येईल की दोघांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे.म्युच्युअल फंडामध्ये असलेल्या २० लाख रुपये गुंतवणुकीपैकी दहा लाख रुपये अक्षयला व्यवसायासाठी लागणार आहेत. एफडीमध्ये असणारे पाच लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवावे लागतील. याचाच अर्थ एफडीमधील पैसे पुढील बारा महिने व्यवसाय किंवा इतर कुठल्या उद्दिष्टांसाठी वापरता येणार नाहीत.

खालील काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या जोरावर अक्षय नोकरी सोडून नवीन व्यवसाय सुरू करू शकतो या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो.
अंकिताची सरकारी नोकरी असल्यामुळे तिचे उत्पन्न पुढील कित्येक वर्षे खात्रीशीर असणार आहे.मुलगी सानवी फक्त दोन वर्षांची असल्यामुळे तिच्या अनुषंगाने होणारे खर्च अजून बरीच वर्षे लांब आहेत.अक्षयचे आताचे वय ३५ वर्षे असल्यामुळे अक्षयकडे निवृत्ती नियोजनासाठी अजून बराच कालावधी शिल्लक आहे.
कुटुंबावर कसलेही कर्ज नाही.मागील काही वर्षांत अक्षय आणि अंकिताने चांगली गुंतवणूक केली आहे.अक्षय, अंकितावर मुलगी सानवी सोडल्यास दुसरी कोणाचीही जबाबदारी नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News