वर्ल्ड बँकेत नोकरी करण्यासाठी 'या' पात्रता आवश्यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

जागतिक बँकेतील नोकरी हि अनेक देशातील लोकांची इच्छा असते. या नोकरीमध्ये जगातील अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थांमध्ये काम करता येते, जगातील अनेक देशांच्या विविध विकासाच्या कामात काम करण्याची संधी मिळते, आणि त्यातही विकसनशील आणि अविकसित देशांसाठी काम करण्याची संधी मिळते. 

जागतिक बँकेतील नोकरीच्या संधी 

युनो प्रमाणेच जागतिक बँकेमध्ये सुद्धा विविध पातळ्यांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात . 

यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम 

जागतिक बँकेतील नोकरी हि अनेक देशातील लोकांची इच्छा असते. या नोकरीमध्ये जगातील अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थांमध्ये काम करता येते, जगातील अनेक देशांच्या विविध विकासाच्या कामात काम करण्याची संधी मिळते, आणि त्यातही विकसनशील आणि अविकसित देशांसाठी काम करण्याची संधी मिळते. 

जागतिक बँकेतील नोकरीच्या संधी 

युनो प्रमाणेच जागतिक बँकेमध्ये सुद्धा विविध पातळ्यांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात . 

यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम 

तरुणांना जागतिक बँकेच्या  खेचण्यासाठी यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम जागतिक बँक चालवते. मागील मागील ५० वर्षांपासून अशा पद्धतीने जागतिक तरुण नेतृत्व जागतिक बँक तयार करत आहे. या कार्यक्रमाचा  हेतू तरुण रक्ताला जगातील असमतोलाची जाणीव  करून देणे,आणि  असमतोल कमी करण्याचे आव्हान देणे हा आहे. 

अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वित्त, संवाद अशा विविध क्षेत्रात जागतिक बँक तरुणांची भरती करते.  

सध्या १७०० हून अधिक तरुण जागतिक बँकेत कार्यरत आहेत. 

पात्रता: 

अ) सदस्य राष्ट्राचा नागरिक 

ब) ३२ वर्षे वयोमर्यादा 

क) पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवी 

ड) इंग्रजी भाषेत प्रभुत्त्व 

इ) ३ वर्षांचा अनुभव 

जागतिक बँकेच्या वापरातील भाषा- अरेबिक, चायनीज, फ्रेंच,  पोर्तुगीज किंवा स्पेनिश या भाषेत प्रभुत्व असल्यास प्राधान्य प्राधान्य. 

या पदांसाठी दरवर्षी हजारो अर्ज बँकेकडे येत असतात. यावर्षीचे अर्ज जून जुलै मध्ये घेतले गेले. निवड झालेल्यांचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये सुरु होईल. 

संपर्क: http://web.worldbank.org/

एनालिस्ट प्रोग्राम  

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांस्ठी जागतिक बँकेच्या विविध  सन्स्थन्मध्यॆ काम करण्याचा अनुभव या कार्यक्रमात मिळतो. अतिशय बुद्धिमान आणि सांस्कृतिक वैविध्यपूर्ण वातावरणात काम करण्याची संधी मिळते. 

पात्रता:पदव्युत्तर पदवी 

इन्टर्न्शिप 

पदवी कलेल्या आणि पदव्युत्तर पदवीस किंवा पीएचडिस प्रवेश घेतलेल्या तरुणांना इंटरन म्हणून काम करता येते. 

वर्षातून दोन वेळा अ) उन्हाळी (जून ते सप्टेंबर)आणि ब) हिवाळी (जानेवारी ते मार्च)मध्ये जागतिक बँक अर्ज स्वीकारते . 

डोनर फंडिंग स्टाफ  

डोनर फंडिंग स्टफिंग प्रोग्राम मध्ये विविध डोनर देशांसाठी जागतिक बँक आपले अधिकारी देते. या अधिकार्यांचा पगार सदर देश देतो. 

या अंतर्गत दोन प्रकारचे अधिकारी नियुक्त होतात,. 

अ) ज्युनिअर प्रोफेशनल ऑफिसर 

पात्रता: १) पदव्युत्तर पदवी

           २) २ वर्षांचा अनुभव   

           ३) ३२ वर्षे वयोमर्यादा 

ब) मिड करिअर प्रोफेशनल 

पात्रता: १) पदव्युत्तर पदवी

           २) २ वर्षांचा अनुभव

जागतिक बँकेतील करिअर म्हणजे आंतर्राष्टीर्य पातळीवर एक प्रतिष्ठित काम करण्याची संधी. आपल्या महाराष्ट्रातून अधिकाधिक तरुण जागतिक पातळीवर कार्यरत व्हावेत यासाठी हा अट्टाहास! 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News