क्युएस ग्लोबल एमबीए रँकींग: टॉप 50 मध्ये देशातील दोन शैक्षणिक संस्थांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद 31 वे स्थान तर (IIM) बेंगलोर 35 वे स्थान पटकावले.

 व्यवस्थापन क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी क्युएस ग्लोबल एमबीए रँकींग 2021 (QSGMR) प्रसिद्ध करण्यात आली. त्यात टॉप 50 मध्ये भारतातील दोन शिक्षण संस्थेचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद 31 वे स्थान तर (IIM) बेंगलोर 35 वे स्थान पटकावले. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकत्ता 51 व्या क्रमांकावर आहे. 

गेल्यावर्षीच्या तुलणेत अहमदाबाद 4 आणि बेंगलोर 9 क्रमांकाने खाली घसरली आहे. गेल्यावर्षी क्यूएस पदव्युत्तर व्यवस्थापन श्रेणीमध्ये आयआयएम बंगलोर भारतातून पहिल्या तर देशातून 26 व्या क्रमांकावर होता, त्यांनी 100 पैकी 36.1 टक्के गुण प्राप्त केले होते. आयआयएम अहमदाबाद 37 व्या क्रमांकावर तर आयआयएम कोलकत्ता 46 व्या स्थानावर होते. 

क्यूएस बिझनेस मास्टर्स रँकींग 2021 च्या यादीनुसार आशिया विभागातून ग्रेट लेक्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंन्ट चेन्नई, आयआयएम कोझिकोड, आयआयएम इंदौर, आयआयएम लखनऊ आणि आयआयएम उयदपूर यांचा क्रमांक 100 नंतर लागतो. एकीकडे सरकार शिक्षणावर भर देत तरी दुसरीकडे भारतातील शिक्षण संस्थाची परिस्थिती खालावत चालली आहे, ही देशासाठी चिंताजनक बाब आहे. 

पदवीच्या मार्कांवर एमबीएला थेट प्रवेश मिळणार

व्यवस्थापन क्षेत्रातली गर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकरने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) संस्थांची स्थापना केली. आयआयएम शिक्षण सस्थेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी इंट्रन्स एक्झाम द्यावी लागले. इंट्रन्स एक्झाम मध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे आयआयएममध्ये प्रवेश दिला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा इंट्रन्स एक्झाम न देता उमेदवारांना थेट एमबीएसाठी प्रवेश दिला जाणार आहे, ज्या शिक्षण संस्थेत एमबीएच्या जागा रिक्त आहेत अशा जागांवर पदवीच्या गुणांवर प्रवेश देण्याचे आदेश सरकारने संस्थाना दिले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News