ग्रहणात अंधश्रद्धा बाजूला ठेवत विद्यार्थ्यांनी केले 'हे' काम; अंनिसचा स्तुत्य उपक्रम

सुशांत सांगवे
Thursday, 26 December 2019

15 वर्षांनी हे ग्रहण दिसत आहे. त्यामुळे शहरातील अनेक शाळांत ग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अनेक शाळांपर्यंत सोलार चष्मे पोचवले होते.

लातूर : काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी दाटलेले धुके यामुळे लातुर शहरात अनेक भागांत खंडग्रास सूर्यग्रहणाचे 'दर्शन' झाले नाही. तर काही भागात अखेरच्या टप्यात अस्पष्ट सूर्यग्रहण पाहता आले. त्यामुळे एकीकडे उत्साह तर दुसरीकडे निराशा असे चित्र पहायला मिळाले. विशेष म्हणजे, अंधश्रद्धा बाजूला ठेऊन विद्यार्थ्यांनी ग्रहण काळात आपले डबे उघडून जेवणही केले.

दशकातले शेवटचे सूर्यग्रहण गुरुवारी (ता. 26) असल्यामुळे अनेकांच्या नजरा या ग्रहणाकडे लागल्या होत्या. दोन ते अडीच तास ते पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. सर्वाधिक लांबीचे हे ग्रहण असूनही सुरवातीचे दोन तास ते लातूरकरांना वातावरणातील बदलामुळे पाहता आले नाही. त्यामुळे अनेक खगोलप्रेमींची निराशा झाली. पण त्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही भागांत ते अस्पष्ट स्वरूपात पाहता आले.

15 वर्षांनी हे ग्रहण दिसत आहे. त्यामुळे शहरातील अनेक शाळांत ग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अनेक शाळांपर्यंत सोलार चष्मे पोचवले होते. याशिवाय, संस्कारवर्धिनी विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यालय आणि शाहू महाविद्यालय येथे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ग्रहण पाहण्यासाठी केंद्र उभे केले होते. याशिवाय, महापालिकेने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने 2 हजार विद्यार्थ्यांना एकाचवेळी ग्रहण पाहण्याचा उपक्रम आयोजित केला होता. इतकीच गर्दी क्रीडा संकुलावरही झाली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News