पुष्पलता मेहता पुरस्कार कीर्तनकार ज्योत्सना गाडगीळ यांना प्रदान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 May 2019

माणूस जोडणे ही अत्यंत अवघड कला मेहता परिवाराकडे आहे. पुढच्या काळात अशी माणसे दिसतील की नाही यात शंका आहे. कलयुगात प्रत्येक माणूस स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. या पुढील काळात दुसर्याचे कौतुक करणारे कार्यक्रम होतील की नाही याबाबत सांशकता आहे, असे मत निवेदक, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अरूंधती भालेराव यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीतील ‘मेहता मित्र मंडळा’च्यावतीने देण्यात येणारा पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी माधवाश्रम सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. अरूधंती भालेराव बोलत होत्या. कै. कैलासभाई मेहता पुरस्कार रांगोळीकार विनायक वाघ तर कै. पुष्पलता मेहता पुरस्कार कीर्तनकार ज्योत्सना गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. यंदाचे पुरस्काराचे 23 वे वर्ष होते.  

 ज्योत्सना गाडगीळ म्हणाल्या, या पुरस्कारप्राप्त व्यक्तींची यादी वाचल्यावर आपले योगदान काहीच नाही असे वाटते.  हा पुरस्कार म्हणजे समाजाप्रती एक चांगले काम करण्यास सुरूवात करा असे सांगत आहे. या पुरस्काराने जशी कौतुकाची थाप दिली आहे तशीच चांगले काम करण्याची जबाबदारी ही टाकली आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News