नॅशनल कॅरम टूर्नामेंट साठी पूर्व मुरुमकारची निवड निश्चित
तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शाळेचे शिक्षकगण यांना दिले आहे.
अकोला : विदर्भ कॅरम असोसिएशन अकोला यांच्या विद्यमाने राऊत वाडी अकोला येथे १४ फेब्रुवारी २०२० ला घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार यांची कन्या पूर्वा मुरूमकार हिने बाजी मारली.
राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. राऊत वाडी अकोला येथे आयोजित अत्यंत चुरशी ही कॅरम स्पर्धा पाहण्यासाठी माजी राज्यमंत्री अझहर हुसेन यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वा मुरुमकार ही ज्युबली इंग्लिश हायस्कूल कुंभारी येथे इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. मार्चमध्ये वाराणशी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी पूर्वा मुरुमकार ही अकोल्याचे प्रतीनिधित्व करणार आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शाळेचे शिक्षकगण यांना दिले आहे.