पुणेरी बिगबाळीची आता तरुणांईमध्ये क्रेझ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 October 2019
  • बिगबाळीने तरुणांच्या मनावर राज्य केले असल्याचे दिसत आहे. ही स्टाइल जुनी किंवा पारंपरिक असली तरी आजची तरुणाई हा दागिना घालून एक स्टाईल म्हणून मोठ्या रूबाबात फिरताना दिसत असते.

बिगबाळीने तरुणांच्या मनावर राज्य केले असल्याचे दिसत आहे. ही स्टाइल जुनी किंवा पारंपरिक असली तरी आजची तरुणाई हा दागिना घालून एक स्टाईल म्हणून मोठ्या रूबाबात फिरताना दिसत असते. बहुतेक तरुणांत बिगबाळी ट्रेंड वाढीस लागला आहे. कुर्ता, पायजमा, एखादी कोल्हापुरी चप्पल या साजशृंगारात आणखीन बिगबाळीची भर पडते आणि पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआपच त्या व्यक्तीवर जातात. 

यासोबतच कपाळावर चंद्रकोर लावली की रांगडे रूप अधिकच रूबाबदार दिसून येते. एवढेच नाहीतर या दागिन्याचे वेध बॉलिवूड व मराठी चित्रपटांना देखील आवरले नाही. खास तर बिगबाळीचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यामुळे बाजीराव मस्तानी या चित्रपटात रणवीर सिंग तर मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटात स्वप्नील जोशी हे कलाकार आपल्याला बिगबाळी लूकमध्ये पाहायला मिळाले आहेत. आता ही बिगबाळी पुण्यापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण तरुणाईच या बिगबाळीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, जीन्स, शेरवानी अशा कोणत्याही कपड्यावर बिगबाळी सूट होते. 

त्यासाठी खास असाच एक प्रकारचा पेहराव परिधान करावा, असे काही नाही. म्हणूनच भिकबाळी हा पारंपरिक दागिना आता ट्रेंडी आणि तरुणाईच्या लूकच्या पंगतीत येऊन बसलाय. कितीही दागिने घातले तरी नाकात सुंदर मोत्याची ठसठशीत नथ जशी स्त्री सौंदर्याला शोभा आणणारी आहे तसेच दोन टपोरे मोती आणि मधे माणिक असलेली बिगबाळी पुरुषांचे सौंदर्य खुलवताना दिसून येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News