JEE Main परीक्षेत पुण्याच्या तरुणाला मिळवले 100 टक्के; MIT परीक्षेतही नेत्रदीय यश
अमेरिकेतील केब्रिज शहरात असलेल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) विद्यापीठाची इन्ट्रन्स परीक्षा चिरगने पास केली. हे विद्यापीठ जगातली सर्वांधीक लोकप्रिय आहे.
मु्ंबई : देशातील सर्वांधीक कठीन JEE Main परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.11) जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याच्या तरुणाने 100 टक्के गुण मिळून नेत्रदीप यश संपादन केले. जगातील सुप्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) विद्यापीठाची इट्रन्स इक्झाम तरुणाने पास केली. त्यामुळे सर्व स्तरातून तरुणाचे कौतुक होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करुन तरुणाला सुभेच्छा दिल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला.
जेईई मुख्य परीक्षेत एकूण 24 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले. त्यात चिरागचा क्रमांक 12 वा आहे. चिराग 4 वर्षापासून IIT परीक्षेची तयारी करतोय. जानेवारीत चिरागने जेईई मुख्य परीक्षा दिली. त्यात 99. 9897 ट्क्के गुण प्राप्त केले. सप्टेंबरमध्ये पुन्हा परिक्षा दिली त्यात 100 टक्के मार्क मिळाले. 'जेईई मुख्य परीक्षा खुप कठीण आहे. या परीक्षेचा पॅरामिटर वेगळा आहे. चटक्कन अभ्यास करुन पटक्कन परीक्षा पास होता येत नाही, त्यासाठी अनेक वर्षापासून सखोल अभ्यास करावा लागतो, बेसिक संकल्पना स्पष्ट असाव्या लागतात. तेव्हा कुठे यश मिळण्याची शक्यता असते', असे चिरागने सांगितले. चिराग जेईई ऑडव्हॉन्स परीक्षेची तयारी करत आहे.
अमेरिकेतील केब्रिज शहरात असलेल्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) विद्यापीठाची इन्ट्रन्स परीक्षा चिरगने पास केली. हे विद्यापीठ जगातली सर्वांधीक लोकप्रिय आहे. जगरातून लाखो विद्यार्थी एमआयटी प्रवेश पुर्व परीक्षा देतात मात्र, अल्प विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यात चिरागचा समावेश आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे विदेश कार्यालय बंद करण्यात आले. त्यामुळे चिरागला अमेरिकेचा व्हिझा मिळू शकला नाही. चिरागने एमआयटी विद्यापीठाचे ऑलाईन क्लासेस जॉईन केले आहे. मात्र अमेरिका आणि भारताच्या वेळेत तफावत असल्यामुळे अनेक समस्या उद्धभवतात. चिरागला ऑलाईन क्लास सकाळी 3 वाजता संपतो.
या पुर्वी चिरागने अनेक उल्लेखनीक काम केले. त्यामुळे बाल शक्ती पुरस्कारने सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ऑलंपीक स्पर्धेत चिरगाने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे राष्ट्रील बाल पुरस्कार देण्यात आला. आकाशातील चांदण्यांविषयी चिरागला प्रचंड आकर्षन आहे. त्यामुळे भौतिक शास्त्रात संसोधन करण्याचा विचार आहे व्यक्त केला.