'या' उत्पादनासाठी पुण्यातील स्टार्टअपला मिळाले ५० लाख रुपयांचे अनुदान

Salil Urunkar
Friday, 4 September 2020

त्याचे नाव आहे प्रमोद प्रिया रंजन. मूळचा झारखंडमधील रांची गावचा असलेला प्रमोद पुण्यातील एमआयटी आर्ट्स, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इनक्यूबेशन सेंटरचा (एआयसी) इनक्युबेटी आहे.

पुणेः एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत असताना वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावताना वापरण्यात येणारे इन्सिनिरेटर यंत्रातून होणारे प्रदुषण आणि त्याच्या घातक परिणामांची माहिती त्याला मिळाली... देशातील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मेन्स्ट्रुअल (मासिक पाळीच्या) कपची माहिती आणि मुलींना वा महिलांना त्याच्या वापरातील अडचणी त्याने जाणून घेतल्या... त्यातून सुरू झाला नवकल्पनेतून नवीन्यपूर्ण उत्पादनाचा प्रवास. वर्षभरातच त्याने सादर केलेल्या नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन कौन्सिलने (बीआयआरएसी) त्याला ५० लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.

त्याचे नाव आहे प्रमोद प्रिया रंजन. मूळचा झारखंडमधील रांची गावचा असलेला प्रमोद पुण्यातील एमआयटी आर्ट्स, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इनक्यूबेशन सेंटरचा (एआयसी) इनक्युबेटी आहे.

प्रमोद याने सांगितले की एमआयटी इंस्टीट्युट ऑफ डिझाईनचे प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर यांच्यासह रांची (झारखंड) येथे केअर फॉर्म लॅबज प्रा. लि. नावाची स्टार्टअप आम्ही स्थापन केली आहे. हे अनुदान कंपनीला मासिक पाळीसंदर्भातील नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विकासासाठी देण्यात आला आहे. यावर माझी टीम आणि मी गेल्या एक वर्षापासून काम करत आहोत. सध्या डिझाईन संदर्भात योग्य प्रमाणात काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आम्हाला 30 लाख रुपयाची आवश्यकता भासणार आहे. भारतात असा प्रकारचे डिझाइन करण्यात येणार हे पहिले उत्पादन असेल.

या डिझाईनसाठी रंजन यांच्यासोबत एमआयटी डिझाईन सेंटरचे संचालक डॉ. धीमंत पांचाळ, एमआयटी आयडीच्या ट्रान्सपोर्टेशन डिझाईनचे प्रमुख डॉ. नचिकेत ठाकूर आणि एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या प्रिन्सिपल रेणू व्यास, के परीख आणि श्रेया येनगुल यांनी काम पाहिले आहे. या उत्पादनाचे काही नमुने तयार करण्यात आले आहेत. लवकरच या उत्पादनाचे लॉन्चिंग करण्यात येईल.

सध्या देशामध्ये दोनशेहून अधिक कंपन्या मेन्स्ट्रुअल कपची विक्री करतात, मात्र त्यांचे उत्पादन हे बहुतांश चीन व अमेरिका येथून आयात केलेले आहेत. त्यामुळे भारतीय स्त्रियांसाठी ती उत्पादने फारशी सोयीची नाहीत आणि म्हणूनच त्याचा वापर व्यापक स्वरुपात होताना दिसत नाही. मेन्स्ट्रुअल कप वापरताना तो लावण्यासाठी, काढताना आणि स्वच्छ करण्यामध्ये सर्वाधिक समस्या येतात व त्यामुळे ती उत्पादने वापरण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रमोद याच्या टीमच्या निदर्शनास आले. त्यातूनच त्यांनी डिझाईन बदलण्यासाठी नवसंकल्पना शोधली आणि नावीन्यपूर्ण उत्पादन बनविले.

एमआयटी एआयसीचे सीईओ डॉ. मोहित दुबे म्हणाले, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि नीती आयोग यांच्या सहकार्यांने युथ-को लॅब च्या राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह चॅलेंज 2020 स्पर्धेत देशभारतील स्टार्टॲप्सने सहभाग घेतला होता. यापैकी १४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली व त्यामध्ये एमआयटी एआयसीच्या स्टार्ट ॲपची निवड झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News