कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना पुणे पोलिसांचा पुणेरी सल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020
  • अलिकेड फेसबुकवर मित्र-मैत्रिणी एकमेंकाना वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज देत आहेत.
  • परंतु सर्वात जास्त जोरात कपल चॅलेंज दिले जात आहे.

मुंबई :- अलिकेड फेसबुकवर मित्र-मैत्रिणी एकमेंकाना वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज देत आहेत. परंतु सर्वात जास्त जोरात कपल चॅलेंज दिले जात आहे. 'पुणे तिथे का उणे' असे उगाच म्हटले जात नाही. त्यात पुणेकर म्हटल्यावर का कुठल्या विषयावरून काय टोमणा मारतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या कपल चॅलेंजवरून पुणे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत चांगलाच टोमणा हाणला आहे.

फेसबुकवर सध्या या ना त्या चॅलेंजला जोर आला आहे. त्यातच कपल चॅलेंज या हॅशटॅगने लोकांना भुरळ घातली आहे. लोकं आपल्या पत्नीसह फोटो अपलोड करत आहे. पण, पुणे पोलिसांनी कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

'कपल चॅलेंजवाल्याला सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल होईल', असा इशारा पुणे पोलिसांनी तमाम चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना दिला आहे.

 

 

सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. बऱ्याच जणांना आपल्या खासगी आयुष्यातील फोटो शेअर करण्याची भलतीच हौस हसते. याची संधी साधून सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करतात. या आधीही सोशल मीडियावर मुलींचे फोटो इतर ठिकाणी वापरण्याचे प्रकार समोर आले होते.

सायबर गुन्हेगार हे तुमचे फोटो हे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकता. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो. एवढंच नाहीतर तुमच्या फोटोचा कुठेही कसा ही वापर होऊ शकतो. फेक अकाउंट असेल किंवा पोर्न साइटसवर सुद्धा हे फोटो वापरण्यात आलेले आहेत. असे अनेक गुन्हे या आधी ही घडले आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी कपल चॅलेंज स्वीकारणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सावधान! तुमच्या WhatsApp वापरण्याच्या सवयीवर आहे Stalkerware सारख्या अ‍ॅपचं लक्ष
जगभर Facebook आणि WhatsApp  या दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाइन चॅटिंग करण्यासाठी ही दोन माध्यसे प्रचंड लोकप्रिय आहेत. जगभरात करोडो युजर्स असलेल्या या दोन्ही माध्यमांच्या सुरक्षेसंदर्भात अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. WhatsApp आणि Facebook दोन्ही ही फेसबुक कंपनीच्या मालकीचे आहेत. सुरक्षेसंदर्भात पुन्हा एक नवीन मुद्दासमोर आला असून आता WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यात तुमचे WhatsApp देखील सुरक्षित राहणार नाही की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही अ‍ॅप्सचा वापर करून WhatsApp च्या मदतीने तुमच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले जाऊ शकते, असे Business Insider च्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे WhatsApp ची सुरक्षा म्हणजे Encryption तोडावे लागत नाही. अगदी सहज या अपच्या मदतीने तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवता येते.

Stalkerware सारखे अ‍ॅप असं ठेवत आहे लक्ष

युजरची माहिती चोरणारी अ‍ॅप युजरवर लक्ष ठेऊन असतात. ज्यावेळी युजर ऑनलाईन येतो, तेंव्हापासून पासून त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. ती व्यक्ती कुणाशी किती वेळ बोलते, कधी अ‍ॅप बंद करते, ऑनलाइन येण्याच्या त्या व्यक्तीच्या सवयी काय आहेत ही सगळी माहिती या अ‍ॅप्सना मिळू शकते. अनेक दिवसांचा आणि आठवड्यांचा डेटा एकत्रित करून या युजरच्या ऑनलाइन सवयींचे आणि वागणुकीचे प्रोफाइल तयार केले जाते.  Electronic Frontier Foundarion (EFF) मधील वरिष्ठ संशोधकांनी असे म्हटले आहे की, गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर अशा पद्धतीची बरीच अ‍ॅप उपलब्ध आहेत.

ही Stalkerware सारखी अ‍ॅप ही माहिती त्यांच्या ग्राहकांना विकतात. सर्व युजरचा डेटा एकत्रित करून ते सर्व डेटा एकमेकांशी मॅच करून पाहतात. त्यानंतर त्यांच्या अ‍ॅपमध्ये ज्या व्यक्तीचा डेटा पहायचा आहे त्याचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या अ‍ॅपच्या मदतीने आपोआप त्याच्या ऑनलाइन हालचाली ट्रॅक होऊ शकतात. ही माहिती पुरवणाऱ्या अ‍ॅपचे ग्राहक या माहितीचा वापर संभाव्य ग्राहकाच्या ऑनलाइन सवयींवरून त्याला काय आणि कधी विकायचं हे ठरवण्यासाठी करतात. काही पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करत असल्याचं देखील समोर आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News