सीओईपीमध्ये १४ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न

सलील उरुणकर
Thursday, 29 October 2020

एकूण ११५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी ७५७ विद्यार्थी हे बी टेक अंतर्गत १० अभियांत्रिकी शाखांचे आणि ४०१ एम टेक अंतर्गत २४ स्पेशलायझेशन्सचे आहेत.

पुणे: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथे चौदावा पदवी प्रदान समारंभ गुरुवारी (२९ ऑक्टोबर) संपन्न झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, सीओईपी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष प्रताप पवार, बोर्डचे सदस्य डॉ. आनंद देशपांडे, संचालक डॉ. बी बी आहूजा, उपसंचालक डॉ. एम एस सुताणे, परीक्षा नियंत्रक डॉ. एस.जी. सोनार व इतर विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

एकूण ११५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी ७५७ विद्यार्थी हे बी टेक अंतर्गत १० अभियांत्रिकी शाखांचे आणि ४०१ एम टेक अंतर्गत २४ स्पेशलायझेशन्सचे आहेत.

शिवाय, ऑनर्स व मायनर्स कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या तुकडीलाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ऑनर्स आणि मायनर्सच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे १०२ आणि १२३ आहे. बी टेक प्रोग्रामच्या प्रत्येक शाखेच्या टॉपर्सना प्रताप पवार यांच्या हस्ते गोल्ड मेडल्सने गौरविण्यात आले. अशा एकूण १० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल्स देण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News