पुलवामा हल्ल्याचा बदला : भारतीय जवानांचं बारावं केलं..!

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

पाकिस्तानच्या 'जैश' ने  पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात तब्ब्ल ४० जवान शाहिद झाले. या घटनेला आज १२ दिवस पूर्ण झाले असून पाकिस्तानने  केलेल्या हल्ल्याचा बदला घेत बालाकोटमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने पहाटे 'जैश'चे प्रशिक्षण तळ उध्वस्त केले.

या दणक्‍यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका आणि या कारवाईमागील कारणे स्पष्ट केली. जैश ए महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरचा भाऊ युसूफ अजहर हा या तळाचा प्रमुख होता. तो जिवंत आहे की नाही, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी सर्वच भारतीयांकडून होत होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील जवानांना कारवाई करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला होता. अखेर भारताने पाकिस्तानच्या दहशदवादांचे तळ उध्वस्त करून खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचे 'बारावे' घातले आहे. भारताने केलेल्या या स्ट्राईकचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News