पुलवामा हल्ला : दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या कुटुंबियांना घेतलं ताब्यात

यिनबझ टीम
Wednesday, 4 March 2020

पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या विरुध्दच्या कारवाई अजून सुरूच आहेत. पुलवामा हल्ल्यात एनआयएला मोठी माहिती मिळाली आहे. ज्या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला होता, त्यासंबंधीत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या एका कुटुंबालादेखील भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे.

पुलवामा येथे आत्मघाती हल्ला केलेल्या आदिल अहमद डार याला काश्मीरमधल्या शाकिर बशीर मागरे, तारिक अहमद शाह आणि तारिकच्या मुलीने मदत केल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, त्याचा आढावा घेत, भारतीय लष्कराच्या एनआयई या टीमने शाकिर मागरे, तारिक शाह आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले आहे. 

आतंकी हमल्याच्या वेळेस आदिल अहमद डारने आपला एक शेवटचा व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओला सायबर सेलच्या माध्यमातून ट्रॅक केल्यानंतर काश्मीर येथील घराचे लोकेशन अढळून आले होते. त्यामुळे त्या घरात राहाणाऱ्या तारिक अहमद शाह आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या संपुर्ण हल्लाचा तपास घेत असताना शाकिर बशीर मागरे हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे समोर आले. शाकीर मागरेवर विस्फोटक पदार्थ एकत्र करणे, सिआरपीएफ जवानांचे लोकेशन ट्रॅक करणे आणि आदिल अहमद डारला मदत करण्याच्या आरोपांवरून ताब्यात घेतले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News