'इंग्रजी' शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा 'ऑनलाइन' पर्यायांकडे ओढा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

काही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेविषयी ज्ञान असते; परंतु ती भाषा बोलण्याइतपत आत्मविश्वास नसतो. चुका झाल्यास सगळे हसतील या भीतीने ते शक्‍यतो मागेच राहतात. अशा वेळेस ती भाषा आत्मसात करण्यासाठी ऑनलाइन क्‍लासेस हा उत्तम पर्याय आहे

औरंगाबाद : इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने त्या भाषेचे ज्ञान असणे आणि वापर करता येणे गरजेचे आहे. आता व्यवहारात प्रत्येक ठिकाणी इंग्रजी भाषेचे लेबल लावले जात असल्यामुळे पूर्वी ऐच्छिक असलेली ही भाषा आता गरज बनली आहे; मात्र ही भाषा शिकण्यासाठी ऑनलाइन पर्यायांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे, असे डॉ. शुभांगी तिवारी यांनी सांगितले.

लहानपणापासूनच स्थानिक भाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना ही भाषा आत्मसात करणे जरा कठीण जाते. शाळेत ते फारसे जाणवत नाही; पण कॉलेजमध्ये गेल्यावर मातृभाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना भीती असते ती नव्या वातावरणाची. इंग्रजी ही भाषा जागतिक असल्याने त्यावर प्रभुत्व असणे गरजेचं आहे; पण ती भाषा येत नाही म्हणून घाबरण्यापेक्षा त्याचा अभ्यास आणि सराव केल्यास प्रगतीची दारे उघडतील ही जाणीव होऊन अनेक जण स्पोकन इंग्लिश क्‍लासेस लावतात.

कुणी ग्रामर शिकण्याकडे लक्ष देतात, असे क्‍लासेस गल्लोगल्ली उघडलेले आपल्याला दिसतात; मात्र इंटरनेटच्या नव्या युगात आता यूट्यूब व्हिडिओतून इंग्रजी शिकण्याचा पर्याय अनेक तरुण हाताळत आहेत, असे डॉ. तिवारी म्हणाल्या. काही इंग्रजी शिकवणाऱ्या तज्ज्ञांनी आता संकेतस्थळे सुरू करून त्याद्वारे या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन इंग्लिश कोचिंग क्‍लासेस सुरू केले आहेत. त्यावर छोटे-छोटे व्हिडिओज्‌ अपलोड करून इंग्रजी शिकण्याचे हे मार्ग खुले करून दिले आहेत. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News