पबजीचा गेम ओव्हर! आता तुमच्याकडे आहेत हे आॅप्शन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 September 2020

आपल्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातलेल्या ११८ अॅप्लिकेशन्समुळे पबजीचा गेम ओव्हर झाला. पण पबजी नाही म्हणून काय झालं असं म्हणत अनेकांनी आपला मोर्चा आता अन्य गेम्सकडे वळवला आहे.

तुमचा-आमचा आवडता मोबाईल गेम पबजी आता आपल्याला खेळता येणार नाही. आपल्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातलेल्या ११८ अॅप्लिकेशन्समुळे पबजीचा गेम ओव्हर झाला. पण पबजी नाही म्हणून काय झालं असं म्हणत अनेकांनी आपला मोर्चा आता अन्य गेम्सकडे वळवला आहे. पबजीएवढी नाही पण या गेम्सची क्रेझही अनेकांना होती आणि ती आता आणखी वाढेल. हे गेम्ससुद्धा रोमांच निर्माण करणारे आहेतच. चला तर मग पाहुया कोणते आणि काय आहेत हे गेम्स!

काॅल आॅफ ड्युटी (Call Of Duty): कॉल ऑफ ड्युटी हा संगणकावर खेळला जाणारा जुना गेम आहे. तरुणाईचा प्रतिसाद लक्षात घेऊन कॉल ऑन ड्युटी गेम मोबाईलवर उपलब्ध करुन देण्यात आला. पबजीचे अनेक रेकॉर्ड कॉल ऑफ ड्युटी गेमने मोडले आहेत. हा गेम शानदार ग्राफिक्स, इंटरअॅक्टिव्ह गेम प्ले आणि युनिक स्टेट्स, बेस्ट मिशनसाठी ओळखला जातो. तरुणाईला वेगळाच थरारक अनुभव देणारा हा गेम आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा गेम उपलब्ध आहे.

गरीना फ्री फायर (Garena Free Fire): गरीना फ्री फायर गेम हा पबजीसारखाच मल्टी प्लेयर  गेम आहे. या गेमचा बेसिक फंडा पबजी सारखचं आहे. ग्राफिक्स थोड कमी देण्यात आले आहे मात्र प्ले गेम म्हणून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. फ्री फायर गेम अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर उपलब्ध आहे. त्यामुळे डाउनलोड करण्यासाठी अडचण येणार नाही.

फोर्टनाईट (Fortnite): फोर्टनाईट गेम विषयी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अमेरिकेमध्ये आयफोन आणि गुगल यांनी आर्थिक कारणामुळे आपल्या प्ले स्टोर वरून हा गेम हटवला. मात्र थर्ड पार्टी प्ले स्टोअरमध्ये फोर्टनाईट गेम उपलब्ध आहे. पबजी सारखाच अनुभव देणारा हा गेम कम्प्युटरवरही खेळता येतो.

बॅटललँड्स राॅयल (Battlelands Royale): बॅटललँड्स रॉयल हा गेम मल्टी प्लेयर आहे. एकाच वेळी ३२ प्लेयर हा गेम खेळू शकतात. मात्र हा गेम पबजीसारखा दीर्घकाळ चालणारा नाही. त्यामुळे कमी वेळात बॅटललँड्स रॉयल गेम पूर्ण करता येतो. या गेमसाठी हाय स्पेसिफिकेशन्सची आवश्यकता नाही. साध्या फोनवर हा गेम खेळता येतो. ऑनलाइन गेम प्रकारात हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. असे अनेक पर्याय आता आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला कोणता गेम आवडला हे आम्हालाही कळवा आणि खेळत रहा!

india

भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News