PUBG ला आता SUBG पर्याय; मराठमोळ्या तरुणाची इनोव्हेटीव्ह कल्पना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 September 2020
  • गेम- ई- ऑन भारतीय गेमींग कपनीने सब्जी लॅन्च केला. निखिल मालनकर या मराठमोळ्या तरुणांनी आपल्या इनोव्हेटीव्ह कल्पनेतून सब्जी गेम तयार केला.

मुंबई : तरुणाईला वेड लावणाऱ्या पब्जी (PUBG) गेमला आता जबरदस्त स्वदेशी बनावटीचा सब्जी (SUBG- स्पेशल युनिट बॅटल ग्राऊंड) गेमचा पर्याय आला आहे. खास एका मराठमोळ्या तरुणांनी सब्जी गेमची निर्मिती केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला. काही दिवसांपुर्वी सब्जी गेम लॅन्च करण्यात आला. गुगल प्ले स्टोअर्समध्ये हा गेम सध्या उपलब्ध आहे. तरुणांना विनामुल्य डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे तरुणाई पुन्हा एकदा सब्जी गेममध्ये रममान होणार हे निश्चित आहे.

सब्जी हा गेम मल्टिप्लेअर आहे. एकाच वेळी आठ खेळाडू गेम खेळू शकतात. फि फॉर वॉल, टीम डेथ मॅच, कॅप्चर दी फ्लॅग या तीन प्रकारे गेम खळण्याची सोय उपलब्ध आहे. गेमला अधिक रोमांचक बनवण्यासाठी पडक्या कारखाण्याचा नकाशा प्लेअर्सना दिला जातो. त्यानुसार नियोजन केल्यास शत्रुचा अचुक अंदाज घेता येतो. हा गेम पब्जी ऐवढा लांब नाही त्यामुळे काही तासात गेम पुर्ण करता येते. एकमेकांमध्ये समन्वय साधून उत्तम प्रकारे गेम खेळता येतो.      

गेम- ई- ऑन भारतीय गेमींग कपनीने सब्जी लॅन्च केला. निखिल मालनकर या मराठमोळ्या तरुणांनी आपल्या इनोव्हेटीव्ह कल्पनेतून सब्जी गेम तयार केला. भारतीय तरुणांची मानसिकता लक्षात घेऊन गेममध्ये अनेक बदल करण्यात आले. तरुणांना सब्जी गेम नक्कीच आवडेल अशा विश्वास गेम- ई- ऑन कंपनीचे संचालक निखिल मालनकर यांनी व्यक्त केला. चीनला शह देण्यासाठी सुरुवातीला ४६ अॅपवर भारत सरकारने बंदी घातली. त्यात टिकटॉक, स्कॉनस्कॉनर अशा लोकप्रिय अॅपचा समावेश होता, त्यानंतर भारतीय सुरक्षेच्या कारणावरुन ११८ चीनी अॅप बंद करण्यात आले. त्यात पब्जी गेमींग अॅपचा समावेश आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News