पबजी खेळतान पार्टनरच्या प्रेमात पडली, मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 September 2020
  • आताचे सर्वच तरूण-तरूणींनी हे ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्थ असतात.
  • परंतु पबजी गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

इंदूर :- आताचे सर्वच तरूण-तरूणींनी हे ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्थ असतात. परंतु पबजी गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गेमच्या वेडापायी एक अल्पवयीन तरुणीने थेट आपल्या गेममधील पार्टनरचे घरे गाठले, ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडली.

काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार इंदूर पोलिसांमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणचा गुन्हा सुद्धा दाखल केला होता. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ही अल्पवयीन मुलगी थेट पंजाबमध्ये आढळून आली. पबजी गेम खेळत असताना तिची ओळख एका मुलाशी झाली. खेळता खेळता ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ती पंजाबला त्याच्या घरी पोहोचली होती, अशी माहिती समोर आली आहे.

इंदूरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कुटुंब राहते. या कुटुंबाने ३१ ऑगस्ट रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा चौकशीत या मुलीबद्दल विचारणा केली असता ती पबजी गेम खेळायची अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या मुलीच्या मोबाइल तपासला असता ती एका मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले. तसेच मित्राचा वाढदिवस असल्यामुळे पंजाबला जाणार असल्याचे तिने आईला सांगितले होते. परंतु, कुटुंबाने तिला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे या अल्पवयीन मुलीने थेट पंजाबला पळून जाण्याचा प्लॅन केला. ती अल्पवयीन मुलगी थेट विमानाने इंदूरहून मुंबईला गेली. आणि तिथून दोघे जण हे अमृतसरला गेले.

पोलिसांनी जेव्हा या मुलीच्या मोबाइल कुठे आहे हे तपासले असता ही मुलगी पंजाबमध्ये असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने इंदूरहून अमृतसर गाठले आणि मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. तर तिच्या मित्राला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News