भारतीय अर्थव्यवस्थेला सहकार व कृषीक्षेत्र उभारणी देणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 April 2020
  • लघु उद्योगासाठी सहकारी संस्थेने तरुणांना कर्ज उपलब्ध करु दिले पाहीजे
  • गोदावरी नांदेड मल्टिस्टेट क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे मत

मुंबई: संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट परसले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले. त्याचा गंभीर परिणार भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना भविष्याची काळजी वाटत आहे. मात्र, नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही कारण भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेला सहकार व कृषीक्षेत्र उभारणी देणार आहे असे मत गोदावरी नांदेड मल्टिस्टेट क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सांगितले. 

लॉकडाऊन काळात तरुणाईशी संवाद साधन्यासाठी सकाळ माध्यम सुहाच्या 'यिनबझ' पोर्टलने 'फेसबुक लाईव्ह' उपक्रम सुरु केला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी दररोज तरुणाईशी संवाद साधतात. बुधवारी (ता. 22)  'सहकार क्षेत्र व बेरोजारी' या विषयावर धनंजय तांबेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून तरुणाईशी संवाद साधला. यावेळी तरुणाईने विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिले आणि तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. 

सहकार क्षेत्र एकमेकांच्या सहकार्यावर चालणारे आहे. त्यामुळे अशा कठीन परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करुन आर्थिक विवंचनेतून नागरिकांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्यांना विश्वास दिला पाहीजे. वार्षिक आराखडा तयार करतांना अतिरिक्त खर्च टाळून तो सामाजिक कार्यात दिला पाहिजे. तसेच भारतीय अर्थव्यवस्था सुरळीतपणे रुळावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. ग्रामिन भागातील विकास हा सहकार आणि कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे सहकार व कृषीक्षेत्र देशाच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणार आहे असे मत धनंजय तांबेकर यांनी व्यक्त केले.

पुढे बोलतांना तांबेकर म्हणाले की, देशातील बाढती बेरोजगारी तरुणांसमोर मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणाक कौशल्य दिले पाहीजे, कौशल्यावर आधारीत तरुणांनी लघुउद्योग सुरु केले पाहीजे, लघु उद्योगासाठी सहकार संस्थेने तरुणांना कर्ज उपलब्ध करु दिले पाहीजे, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे सुरु होतील आणि भारत देश हा मॅन्यूफॅक्चरिंगचा हब बनेल असा दृठ विश्वास तांबेकर यांनी व्यक्त केला.

   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News