अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्थेकडून हैदराबाद हत्याकांड प्रकारणी जाहीर निषेध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 December 2019
  • हैदराबाद येथे झालेल्या डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या वर अमानुष अत्याचार व हत्या या घटनेने परत एकदा महिला मुली सुरक्षित नाही हेच दाखवून दिले अशा किती डॉक्टर प्रियंका रेड्डी सारख्या महिला मुली बळी पडणार आहे ?

अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था अंधेरी मुंबई या संस्थेमार्फत हैदराबाद येथे झालेल्या डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर अमानुष अत्याचार आणि त्यांची निघृण हत्या याचा जाहीर निषेध नोंदवला आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. हैदराबाद येथे झालेल्या डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या वर अमानुष अत्याचार व हत्या या घटनेने परत एकदा महिला मुली सुरक्षित नाही हेच दाखवून दिले अशा किती डॉक्टर प्रियंका रेड्डी सारख्या महिला मुली बळी पडणार आहे?

ह्या घटनेमुळे जनतेमध्ये आक्रोश आहे प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळालाच पाहिजे हि घटना माणसाला काळिमा फासणारी आहे या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. या संस्थेच्या आणि मुंबईमधील शाळेतील मुलींमध्ये आणि महिलान मध्ये या गोष्टीचा आक्रोश बघायला मिळाला. आज प्रत्येक कानाकोपऱ्यातील महिला मुली याच गोष्टीचा  न्याय मागत आहे पण हा न्याय मिळणार कधी असा कायदा का सरकार बनवू शकत नाही ???

नराधम असे कृत्य करतात त्यांच्याबरोबर भर चौकामध्ये पूर्ण जनतेच्या समोर त्यांना फाशी देऊ शकलो पाहिजे जर असा कायदा आपल्या भारतामध्ये आला तर नक्कीच बलात्कार या घटना होणार नाही.  का आपण आपल्या कायद्यामध्ये बदल करून अशा निघृण हत्या आणि बलात्कार  अशा घटना थांबवू शकत नाही अशा नराधमांना त्याच क्षणी खटला न चालवता  फाशीची शिक्षा का  देऊ शकत नाही.

प्रत्येकाकडून हेच ऐकायला मिळाले की आम्हाला न्याय कधी मिळणार??? आम्ही सुरक्षित कधी होणार ? आम्ही समाजामध्ये कधी बिनधास्तपणे वावर करू? तेव्हा  आमची सरकारला विनंती आहे आम्हाला संरक्षण द्या नाहीतर उद्या आमच्यावर हा प्रसंग ओढवला तर आम्ही अशा नराधमांना मारण्या सही मागेपुढे बघणार नाही कारण अजून डॉक्टर प्रियंका सारख्या मुली महिला यांचा आम्हाला बळी द्यायचा नाही . आम्हाला फक्त न्याय आणि न्याय पाहिजे आहे असे संस्थेच्या अध्यक्षा सुनिता सचिन नागरे महिलावर्ग आणि शाळेतील मुली बोलत होत्या. आमच्या सर्वांतर्फे डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

देशात माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे निर्भयानंतर झालेली हैदराबाद येथील घटना होय. अत्याचार करून एका जिवंत तरुणीला अमानुषपणे जाळलं जातं, हीच खरी देशातल्या कायद्यावर प्रश्नचिन्ह उठवणारी गोष्ट आहे.

महाराष्ट्रातही कोपर्डीसारखे अनेक प्रकरणं घडत असतात, व त्या प्रकरणांवर काहीवेळा पडता टाकला जातो. एका बलात्कार्याच्या शीक्षेला घेऊन सौदी देशांमध्ये आणि भारतात जो फरक आहे, तो फरक जेव्हा नाहीसा होईल, त्यावेळेला देशातल्या अशा घटनांवर आळा बसेल, नाहीतर अशा घटना रोज घडत जातील आणि आपण फक्त श्रद्धांजली वाहत बसू.

-सुनिता सचिन नागरे (संस्थापक-अध्यक्ष अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News