आंदोलकांनी पोलिसांना घेरल, मुस्लीम तरुणांनी वाचवल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 December 2019

आंदोलकापासून पोलिसांना इजा होवु नये म्हणून काही मुस्लीम तरुण पोलिसांभोवती रिंगन करुन उभे आहेत. आंदोलकांच्या दगडापासून पोलिसांचा बचाव करत आहेत.

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारण विधेयकावरुन संपुर्ण देशात असंतोषाची लाट पसरली आहे. देशाच्या कानाकोपऱ्याच आंदोलने सुरु आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळन लागले आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्याच तुंबळ हानामारी झाली आहे.

पोलीस आणि आंदोलक यांच्यातील तुंबळ मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आंदोलकांनी पोलिसांना घेराव घातल्याच पाहायला मिळत आहे. आंदोलक पोलिसांना घेराव घालून दगडफेक करत आहेत. आदोलकांपासून बचावासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. 

 

त्याच आंदोलनातील काही तरुण पोलीसांच्या बचावासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. आंदोलकापासून पोलिसांना इजा होवु नये म्हणून काही मुस्लीम तरुण पोलिसांभोवती रिंगन करुन उभे आहेत. आंदोलकांच्या दगडापासून पोलिसांचा बचाव करत आहेत. हातात तिरंगा घेवुन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न काही युवक करत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामधही ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह- ए- आलम भागातील आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यात पोलिस अधिकारीसह 19 कर्मचारी जखमी झाले. आंदोलकारोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. हिंसाचार करणाऱ्या 32 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनाचे व्हिडीओ तपासून दोषी आढळणाऱ्या लोकांवर कार्यवाही केली जाईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.  

एकीकडे नागरिकत्व सुधारणा विधेयक विरोधात तरुणांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांचा बचाव करण्यासाठी काही तरुण सरसावले आहेत. तरुणाईचे सामाजिक भान सरकारने वेळीच ओळखले नाही तर देशाला मोठे नुकसान सोसावे लागेल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News