वांग्याचं नाव ऐकून तोंड वाकडं करू नका: या आरोग्यदायी फायद्यांसाठी आहारात वांगी हवीच!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 September 2019

वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात. वांगी कोणत्याही स्वरूपात खाणे फायद्याचे असते. तर आज आपण या भाजीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घेऊया.

वांग्याचे फायदे

भूक नियंत्रित करते, कारण त्यात जास्त फायबर आणि बिया असतात, यामुळे पोट बर्‍याच काळासाठी भरलेलं राहतं. 
वांग्यात खूप कमी कॅलरीज असतात. एक कप शिजवलेल्या वांग्यातून तुम्हांला ३५ कॅलेरीज मिळतात. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. 
बर्‍याच मध्य-पूर्वेकडील आणि इटालियन पदार्थांमध्ये वांगी असतात कारण त्यात एरोबिन असते (सालासकट), जे आरोग्यासाठी चांगलं असतं. 
वांगं आयुर्वेदिक औषधाप्रमाणेही कामं करतं. हे निद्रानाश आणि झोपेच्या इतर विकारांना देखील बरे करते.
वांगी मधुमेह नियंत्रित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उच्च फायबर आणि लो कार्बची मदत होते.
वांगं हे लोह आणि कॅल्शियमनं समृद्ध असते. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News