#prokabaddi2019 आरतीचा कब्बडी, लव्ह मॅरेज ते रेफरीपर्यंतचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

मुंबई - सध्या प्रो कबड्डीचा सातवा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये खेळाडूंसोबतच एका कबड्डी रेफरीचे नावही खूप चर्चेत आहे, ते म्हणजे आरती बारी. सध्या देशात कबड्डी महिला रेफरींमध्ये दोन नावे प्रमुख स्थानावर आहेत, त्यापैकी आरती बारी हे नाव प्रामुख्याने घेतलं जात.

मुंबई - सध्या प्रो कबड्डीचा सातवा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये खेळाडूंसोबतच एका कबड्डी रेफरीचे नावही खूप चर्चेत आहे, ते म्हणजे आरती बारी. सध्या देशात कबड्डी महिला रेफरींमध्ये दोन नावे प्रमुख स्थानावर आहेत, त्यापैकी आरती बारी हे नाव प्रामुख्याने घेतलं जात.

गेल्या पंधरा वर्षांपासून कबड्डी आणि रेफरी अशी भुमिका बजावणाऱ्या आरती यांची कारकिर्द खूप तरुण आणि तरुणींना आदर्श शिकवणारी आहे. मुंबईतल्या लालबाग परळ आणि चिंचपोकळी अशा भागामंध्ये आपल्या खेळाने नाव कमवणाऱ्या आरती असं सांगतात की, "कबड्डी हा माझा श्वास आहे, त्याच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही, मी याआधी जिल्हा तसेच नॅशनल स्पर्धांमध्ये खेळत होते, तेव्हापासून कबड्डी हे माझं पहिलं प्रेम आहे." 

कबड्डी आणि लग्न या दोघांमध्ये कबड्डीला निवडणार असा निर्णय घेतल्यानंतर पती अजय बारींनी देखील याला विरोध केला नाही. आरती सांगतात की माझं लव्ह मॅरेज आहे. लग्नानंतर कबड्डीशी संबंध तोडणार नाही, या अटीवर त्यांनी लग्न केलं होतं आणि घरच्यांनीदेखील त्याला पाठिंबा दर्शवला होता. कबड्डी खेळा सोबतच अजून काहीतरी आव्हानात्मक करण्याच्या उद्देशाने त्यांनी रेफरी होण्याचा निर्णय घेतला आणि आज आरती ह्या प्रो कबड्डी लीग सातच्या मुख्य रेफरींमधल्या एक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News