आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती

आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून एआयआर स्कॅनरची निर्मिती

प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर भारत उभारण्याच्या संकल्पनेला आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून हातभार लावला जातो. डोब आणि कॅम स्कॅनरसारख्या चिनी अ‍ॅपना पर्याय म्हणून आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रीडिंग स्कॅनरची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे अॅप्लीकेशन बाजारपेठेत विदेशी अॅपला टक्कर देईल असा विद्यार्थ्यांना विश्वास आहे.

लॉकडाउन काळात अनेकांना घरातून कामाला प्राधान्य दिले, पालक विद्यार्थी यांनी सुध्दा लॉकडाउन काळात घरातून काम केले आहे, त्या सगळ्यांना हे अॅप उपयुक्त ठरेल अशी माहिती रोहित चौधरी आणि कवीन अग्रवाल यांनी दिली. आयआयटीच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी या अॅपची निर्मिती केली आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये लागणारी वस्तू म्हणजे स्कॅनर आहे. ते तयार करणे आणि इतरांना शेअर करण्याची सुविधा सुध्दा अॅपमध्ये आहे. हे अॅप एक प्राथमिक गरज म्हणून सुध्दा भविष्यात वापरले जाऊ शकते.

अनेक चिनी  अॅपवर भारताने बंदी घातली आहे, त्यामुळे अधिक वापरात असलेली अॅप बंद असल्याने भारतीयांचे हाल होते. परंतु सध्या या अॅपमधून आपल्या ब-याच गोष्टींच निराकरण होईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. १५ ऑगस्टला या अॅपचे अधिकृतरीत्या अनावरण करण्यात आले. सध्या अनेक लोकांशी संपर्क साधत असून त्यात अजून बदल करण्यात येणार असल्याचे रोहित आणि कवीन यांनी सांगितले.

तयार केलेल्या या अॅपमध्ये सध्या इंग्रजी भाषा असली तरी लवकरचं त्यात भारतीय भाषांचा वापर होणार आहे. हे अॅप सर्वसामान्य व्यक्तीला सुध्दा वापरता आले पाहिजे असे तयार करण्यात आले आहे. आमचे हे अ‍ॅप बाजारात आत्मनिर्भर भारत अभियानात महत्त्वपूर्ण संशोधन ठरेल इतके नक्की. - कवीन अग्रवाल, आयआयटी बॉम्बे, सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थी

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News