3 हजार 200 मेगापिक्सल कॅमेऱ्याची निर्मिती; पाहा जगातला सर्वात मोठा फोटो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020

नॅशनल एक्सेलेटर लॅबोरेटरी ब्लॉग पोस्टनुसार (SALC) स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी 3 हजार 200 मेगापिक्सला फोटो काढळा, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा सेन्सर्स आहेत. त्यासाठी एक अत्याधुनिक डिजिटल कॅमेरा बनवण्यात आला.

फोटोग्राफीची क्रेझ तरुणाईमध्ये प्रचंड आहे. फोटोग्राफी करण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या मेगापिक्सलचे मोबाईल फोन, कॉमेरे वापरत असते. अशाचं एका अवलिया संशोधकांनी 3 हजार 200 मेगापिक्सलच्या डिजिटल कॉमेऱ्याने फोटो काढला. हा जगातला सर्वांत मोठा फोटो आहे. त्यासाठी संशोधकांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागले. 

नॅशनल एक्सेलेटर लॅबोरेटरी ब्लॉग पोस्टनुसार (SALC) स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी 3 हजार 200 मेगापिक्सला फोटो काढळा, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा सेन्सर्स आहेत. त्यासाठी एक अत्याधुनिक डिजिटल कॅमेरा बनवण्यात आला. चिली विद्यापीठाच्या लिगेसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम (LSST) दुर्बिणीत हा कॅमेरा बसवला जाणार आहे. गडद उर्जा, गडद पदार्थांचा अभ्यास करण्यासाठी हा कॉमेरा उपयोगी येणार आहे. 

कॅमेराने घेतलेला फोटो पाहण्यासाठी 378 4K अल्ट्रा-हाय-डेफिनिशन फुल स्क्रीनचा टिव्ही लागणार आहे. सुक्ष्म आणि बारीक बस्तू इतर कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही, अशा वस्तूंचा फोटो हा कॉमेर सहज घेऊ शकतो. कॅमेऱ्याचे रिझोल्यूशन अतिउच्चप्रतीचे देण्यात आले. 15 मैल लांब अंतरावरचा गोल्फ बॉल कॉमेऱ्यातून सहज टिपता येतो. साधारण डोळ्याने न दिसणाऱ्या अद्रृष्य वस्तू कॉमेऱ्याने सहज दिसतात. एखादी वस्तू 100 दशलक्ष वेळा शोधू शकते. येवढी क्षमता कॉमेऱ्याची आहे. हे 189 सेन्सरद्वारे शक्य झाले. 

कॉमेराने 3 हजार 200 मेगापिक्सेलचा फोटो घेऊन पहिली चाचणी यशस्वी रित्या पुर्ण केली. कॉमेऱ्याचे आणखी काही  महत्वपुर्ण टप्पे बाकी आहेत. कॅमेऱ्याला अंतिम रुप देण्यासाठी संशोधक कठोर परीश्रम घेत आहेत. संपु्र्ण कॉमेरा 2021 मध्ये पुर्ण होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News