प्रियांकाच्या फिटनेस टीप्स

प्रियांका चोप्रा, अभिनेत्री
Monday, 10 June 2019

मी चीजी बर्गर, पिझ्झा या गोष्टी खाल्ल्यावर वजन वाढल्यासारखे वाटल्यास मात्र लगेचच सलाड, प्रोटिन, सूप असे घ्यायला सुरवात करते. 

मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर, पिझ्झा या गोष्टी खाल्ल्यावर वजन वाढल्यासारखे वाटल्यास मात्र लगेचच सलाड, प्रोटिन, सूप असे घ्यायला सुरवात करते. 

आठवडाभर मी हेल्दी खात असते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र मी माझा आवडता चॉकलेट केक, तंदुरी असा ‘चीट डाएट’ असतो. एरवीही माझ्या आहारात भाज्या, फळे आणि खूप प्रमाणात पाणी असते. तुम्ही दिवसाला किमान १० ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. यामुळे तुमची त्वचा खूप छान राहते. मी मात्र ग्लासांचे हे प्रमाणे नेहमीच जास्त ठेवते. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये दोन अंडी किंवा ओटमील आणि एक ग्लासभर मलईविरहित दूध घेते. दुपारच्या जेवणात २ चपात्या, भाजी, डाळ आणि सलाड खाते, तर संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी टर्की सॅण्डवीच किंवा कडधान्य खाते. रात्रीच्या जेवणात सूप, ग्रील्ड चिकन किंवा मासे खाते. 

यासोबतच वर्कआऊटही गरजेचे असल्याने मी १५ मिनिटे ट्रेडमीलवर धावते. त्यानंतर पुशअप्स वगैरे करते. जिमला जाण्याचा मला कंटाळा आल्यास मी फक्त धावते. शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी मी योगासने करते. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योगासने महत्त्वाची आहेत. त्यामुळे माझ्या फिटनेसमध्ये योगासनांना विशेष महत्त्व आहे.  हेल्दी राहण्यासाठी शक्‍यतो घरातले खा. तळलेले पदार्थ खाणे टाळा. तुमच्या आवडत्या पदार्थांची आठवड्यातून एखादा चव घ्या. ताजे आणि पौष्टिक अन्न खाण्यावर भर द्या. 

दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर व्यायाम करा. यामुळे शरीर रिलॅक्‍स होते. रक्तदाब व पचनक्रिया सुधारते.

सकाळचा नाश्‍ता कधीही चुकवू नका. तुम्ही डाएटवर असलात, तरी हेल्दी नाश्‍ता घ्यायला हवा. यामध्ये शक्‍यतो फळे, फळांचा रस, कमी फॅट असलेले दूध, उकडलेले अंडे यांचा समावेश करा.

सकाळी दात चांगले घासा. दोन मिनिटे सर्व बाजूंनी दात स्वच्छ करावेत, यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. झोपण्यापूर्वीही दात घासण्याची सवय असावी. 

स्वतःला नेहमी प्रोत्साहित करतील, अशी पुस्तके वाचावीत. वाचण्याचा कंटाळा आल्यास प्रोत्साहित करणारे संगीत ऐका, व्हिडिओ पाहा. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी हे आवश्‍यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News