भारतातील पहिली अंध न्यायाधीश म्हणून प्रियांका ठाकूर यांची वर्णी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

मुंबई : मूळच्या हिमाचल प्रदेशच्या असलेल्या प्रियांका ठाकूर ह्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे प्रियांका ठाकूर ह्या दिव्यांग असून त्यांना जन्मापासूनच अंधत्व आले आहे.

स्वतःच्या या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी न्यायाधीशपदी बाजी मारली आहे. प्रियांका ठाकूर ह्यांचे गाव हिमाचल प्रदेशमधील इंदोर जिल्ह्याचं. लहानपणापासूनच कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी व्यक्ती घरातच असल्यामुळे त्यांच्यावर हे लहानपणापासूनच संस्कार होत गेले.

प्रियांका ठाकूर यांचे वडीलच केंद्रीय सीमा सुरक्षा दलामध्ये अधिकरी पदावरून निवृत्त झाले त्यामुळे प्रियांका ठाकूर ह्यांनी स्वतःच्या वडिलांसारखच घवघवीत यश संपादित केले आणि आणि हिमाचल प्रदेश विद्यापीठ मधून न्यायशास्त्र या विषयात पीएचडी संपादन केली.

तसेच केंद्रीय न्यायिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून न्यायाधीशपदी निवड झाली. लवकरच ती न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News