'प्रियांका' सुपरहिरोंच्या वाटचालीवर

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Wednesday, 3 April 2019

बॉलीवूड ते हॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या प्रियांकाचं नाव चर्चेत आहे ते  ‘ॲवेन्जर्स - एंडगेम’ या चित्रपटामुळे.

बॉलीवूड ते हॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या प्रियांकाचं नाव चर्चेत आहे ते  ‘ॲवेन्जर्स - एंडगेम’ या चित्रपटामुळे.

‘ॲवेन्जर्स- एंडगेम’ हा मार्व्हल स्डुडिओचा चित्रपट येत्या २६ एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे. भारतात ‘मार्व्हल’ चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला मुंबईतून सुरुवात झाली.

मुंबईत प्रमोशन सुरू असताना ‘ॲवेन्जर्स- एंडगेम’चे सहायक दिग्दर्शक ज्यो रुसो तेथे उपस्थित होते. या वेळी भारतीय कलाकारांचं कौतुक करताना त्यांनी प्रियांकाचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, ‘भारतातील प्रेक्षकांनी माव्हर्लच्या सगळ्या चित्रपटांसाठी आम्हाला भरभरून प्रेम दिलं.

भारतीय अभिनेत्री प्रियांकाबरोबर काम करायला मला आवडेल. एका प्रोजेक्‍टसाठी आमचं प्रियांकासोबत बोलणं सुरू आहे. तो प्रोजक्‍ट काय असेल हे तुम्हाला कळेलचं.’ त्यामुळे मार्व्हलच्या आगामी चित्रपटात प्रियांका असणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News