खासगी शाळांनी केवळ ट्युशन फी च घ्यावी ; पालकमंत्र्यांना निवेदन

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Tuesday, 4 August 2020
  • शहरातील खाजगी शाळांनी ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये तसेच भारतीय विद्या भवन शाळेने आरटीई प्रवेश अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्या बाबत आणि भारतीय विद्या भवन शाळा शासकीय आदेशाची पायमल्ली करणेबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या उपस्थितीत जागृत पालक समिती, हिंगणघाटचे पदाधिकारी सौ. शुभांगी डोंगरे, नगरसेवक  सुरेश मुंजेवार, गजू कुबडे ज्वलंत मून इत्यादीच्या वतीने हिंगणघाट येथे पालकमंत्री सुनील केदार आले असताना निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट :- शहरातील खाजगी शाळांनी ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये तसेच भारतीय विद्या भवन शाळेने आरटीई प्रवेश अंतर्गत तीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्या बाबत आणि भारतीय विद्या भवन शाळा शासकीय आदेशाची पायमल्ली करणेबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या उपस्थितीत जागृत पालक समिती, हिंगणघाटचे पदाधिकारी सौ. शुभांगी डोंगरे, नगरसेवक  सुरेश मुंजेवार, गजू कुबडे ज्वलंत मून इत्यादीच्या वतीने हिंगणघाट येथे पालकमंत्री सुनील केदार आले असताना निवेदन देण्यात आले.

माजी आमदार प्रा. राजू तिमांडे आणि जागृत पालक समिती यांच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, हिंगणघाट शहर ही कामगार नगरी असून कोविड-१९ जागतिक महामारी असून मोठ्या प्रमाणात जनता बेरोजगार झाली आहे. अशा परिस्थितीत घर कुटुंब चालविणे देखील कठीण झाले आहे ही बाब लक्षात घेऊन शहरातील काही शाळा पालकांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्याचा सपाटा लावला आहे. तरी आपण आपल्या स्तरावर शहरातील शाळा व्यवस्थापनाला आदेश देऊन ट्यूशन फी व्यतिरिक्त कोणतीही फी घेण्यात येऊ नये असे आदेश देण्यात यावे.

तसेच भारतीय विद्या भवन या शाळेत तीन विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत राखीव मोफत प्रवेश मिळाला आहे परंतु भवन्सच्या व्यवस्थापनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील २५% विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत शाळेतील मोफत शिक्षण देण्याची प्रवेश प्रक्रिया नाकारली आहे. शाळेतील प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण घेणार नाही असे लेखी संमती पत्र बळजबरीने लिहून घेतल्या जाते याप्रकरणी शाळेवर योग्य कारवाई करून पालकांना न्याय द्यावा.

भारतीय विद्या भवन्स शाळा व्यवस्थापन शासकीय आदेशाची वेळोवेळी पायमल्ली करून देखील शाळेवर कोणतीही कारवाई होत नाही. उदाहरणार्थ शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणे, पी. टी. ए कोणतेही गठण नसताना मनमर्जी फी वाढ करून पालकांची लूट करणे अशा अनेक गंभीर प्रकार या प्रकाराला आपण शासन म्हणून राज्य शासनाचे ऑडिटर पाठवून चौकशी करून पालकांना न्याय द्यावा अशी विनंती पालकमंत्री सुनील केदार यांना माजी आमदार प्रा. राजू तिमांडे आणि जागृत पालक समितीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News