...'या' कारणामुळे २ हजारांच्या नोटांची छपाई बंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

2 दोन हजारांच्या नोटांची मागणी आपोआप कमी झाली. बॅंकानेही आता २ हजारांच्या नोटांची मागणी घटवली आहे त्यामुळे आरबीआयने नोटा छपाई बंद केली

मुंबई : 2 हजार रुपयांच्या नोटांची मागणी घटल्यामुळे गेल्या वर्षापासून नोटांची छपाई बंद करण्यात आली, अशी माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालातून समोर आली. सर्वसामान्य ग्राहकांकडून 2 हजारांच्या नोटांची मागणी घटली आहे, दोन हजारांच्या नोटांचे सुट्टे सहज मिळत नसल्यामुळ ग्राहकांनी 500, 200 आणि 100 या नोटांना पसंती दर्शवली. त्यामुळे दोन हजारच्या नोटांची मागणी कमी झाली आणि शंभर, दोनशे, पाचशे नोटांची मागणी वाढली. अशा परिस्थितीत आरबीआयने 2 हजारच्या नोटांची छपाई बंद केल्यांची माहिती उघड झाली आहे.

सर्व व्यवहार कॅशलेस झाल्यामुळे ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करण्याचा मार्ग ग्राहक आणि बँकांनी स्वीकारला. त्यामुळे 2 दोन हजारांच्या नोटांची मागणी आपोआप कमी झाली. बॅंकानेही आता २ हजारांच्या नोटांची मागणी घटवली आहे त्यामुळे आरबीआयने नोटा छपाई बंद केली. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या जुन्या नोटा बंद केल्या. आणि 100, 200, 500, 2000 च्या नवीन नोटा छापण्यास सुरुवात केली. 100, 200, 500 रक्कमेच्या नोटांची चिल्लर करणे सोपे असल्यामुळे ग्राहकांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र 2 हजारच्या नोटांना ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिला. त्यामुळे आरबीआयला शेवटी 2 दोन हजारच्या नोटा छापणे बंद करावे लागले.

२ हजारच्या नोटा कोणत्या वर्षात किती छापल्या गेल्या.

           वर्ष                    नोटांची छपाई 

  • 2016- 17        350 कोटी रुपयांच्या नोटांची छपाई 
  • 2017- 18        15 कोटी 10 लाख नोटांची छपाई 
  • 2018- 19        4 कोटी 70 लाख  नोटांची छपाई  
  • 2000- 19        एकही नोट छापली गेली नाही 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News