पंतप्रधान देणार लवकरचं राजीनामा, हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

पंतप्रधान देणार लवकरचं राजीनामा, हे आहे कारण...

पंतप्रधान देणार लवकरचं राजीनामा, हे आहे कारण...

महाराष्ट्र - तब्येत शरीराची साथ देत नसल्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे राजीनामा देणार आहेत. जपानच्या एका राष्ट्रीय वृत्तवाहीनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील काही दिवसांपासून तब्येत खालावत असल्यामुळे कामावर त्याचा परीणाम होऊ नये, यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळचे मित्र असून मैत्रीमुळे जपान आणि भारताचे संबंध अधिक बळकट झाल्याचे काही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मागील अनेक दिवसांपासून आबेंची तब्येत बरी नाही, मागील काही दिवसांपासून त्यांनी तेथील रूग्णालयाला भेट दिली आहे. त्यामुळे ते राजीनामा देणास असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे. आज पत्रकार परीषद घेऊन घोषणा करतील असं सांगितलं जातं आहे.

सध्याच्या तेथील सत्ताधारी पक्षाने आबेंची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले होते. पण रूग्णालयाला भेट देत असल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मागच्यावेळेस तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांना तिथं आठ तास थांबावे लागेल. त्यामुळे त्यांच्या आजाराची गंभीरता दिसून येते.

जपानमधील पंतप्रधान पदाची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. सोमवारी त्यांनी सर्वाधिक काळ जपानच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम स्वत: च्या नावावर केला आहे. त्यांनी त्यांच्या काकांचा विक्रम मोडल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं होतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News