प्राथमिक शिक्षणाचा ‘ब्लॅकबोर्ड’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 March 2019

शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे आजवर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. ‘ब्लॅकबोर्ड वर्सेज व्हाईटबोर्ड’ नावाचा हिंदी चित्रपट येत्या १५ मार्चला प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट सरकारी शाळेतील प्राथमिक शिक्षणावर भाष्य करणारा असेल. सरकारी शाळेची आताची अवस्था आणि तेथील प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाय, या चित्रपटाची कथा गमतीशीररित्या रुपेरी पडद्यावर मांडण्यात येईल. माइलस्टोन क्रीएशन्स, रतन श्री एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण बिष्ट यांनी केले आहे. या चित्रपटात रघुबीर यादव, अशोक सामर्थ, अलीस्मिता गोस्वामी, पंकज झा आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News