स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी 'हे' करा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 May 2019

महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. हेच सर्वाधिक महिलांच्या मृत्यूचेही कारण आहे.

महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. हेच सर्वाधिक महिलांच्या मृत्यूचेही कारण आहे. खरंतर अगदी सहज टाळता येणाऱ्या काही कर्करोगांपैकी हा एक आहे. तसेच हा एकमेव कर्करोग आहे, की त्याच प्राथमिक निदान महिला स्वतः करू शकतात. पण याच्या लक्षणांबद्दल आणि प्राथमिक अवस्थांबद्दल आपल्या देशातील महिलांना माहितीच नाही. त्याबद्दल जनजागृती नाही. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्याकडे वाढत असल्याचे दिसून येते.

स्तनाचा कर्करोगाची तपासणी महिलांना स्वतःलाही करता येते. त्यासाठी ‘टच’, ‘लूक’, ‘चेक’ हा फॉर्म्युला कर्करोगतज्ज्ञांनी जगभरात विकसित केला आहे. स्तनात कोणती गाठ आहे का, हे या तीन सोप्या पद्धतीने महिलांनी स्वतः नियमित तपासावे. स्तनाला केलेल्या स्पर्शातून स्वतःला त्यात काही वेगळेपणा जाणवतो का, ते तपासावे. स्तनांच्या आकारात काही फरक पडलाय का, हे पाहावे. तसेच त्वचेचा पोतात काही बदल झालाय का, हे देखील पाहावे. यात तुम्हाला कोणता बदल जाणवला तर घाबरून न जाता आपल्या डॉक्‍टरांशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

स्तनात झालेला बदल, त्यातील गाठ म्हणजे कर्करोग नसतो. त्याचे अचूक निदान करण्यासाठी मॅमोग्राफी चाचणी करावी लागते. अल्ट्रासोनोग्राफीसह इतर काही वैद्यकीय चाचण्याही त्यासाठी कराव्या लागतात. पण, बायोप्सीनंतरच त्याचे अंतिम निदान केले जाते. बायोप्सी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर नेमक्‍या कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, हे पाहिजे जाते. त्यानुसार उपचार केले जातात. लवकर निदान झालेल्या कर्करोगावर प्रभावी उपचार करून तो पूर्ण बरा करता येतो. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News