जैवसुरक्षित वातावरणात अमेरिकेत बास्केटबॉल लीगची पूर्वतयारी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण असलेल्या अमेरिकेत आता एकमेकांशी संपर्क येत असलेल्या बास्केटबॉल लीगची पूर्वतयारी सुरू झाली आहे.

वॉशिंग्टन:  कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण असलेल्या अमेरिकेत आता एकमेकांशी संपर्क येत असलेल्या बास्केटबॉल लीगची पूर्वतयारी सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर लीगमधील सामने कसे असतील, हे दर्शवणारा सामनाही खेळवण्यात आला.

तब्बल चार महिन्यांत एनबीएमधील संघात बास्केटबॉलची लढत झाली. त्यात लॉस एंजलीस क्‍लिपर्सने ओरलॅंडो मॅजिकला 99-90 असे पराजित केले; पण सामन्याच्या निकालापेक्षाही अखेर 11 मार्चनंतर अमेरिकेत एनबीएतील दोन संघात बास्केटबॉल लढत झाली हे महत्त्वाचे होते. चाहत्यांच्या अनुपस्थितीत जैवसुरक्षित वातावरणात सुरू होणारी ही स्पर्धा अमेरिकावासीयांसाठी खूपच भिन्न असेल.

या लीग सामन्याच्या वेळी एकंदर दोनशे लोकच असतील. कोर्टवरील व्यक्तींची संख्या कमी करण्यासाठी रोबो कॅमेरामनचा जास्त वापर होणार आहे. कोर्टच्या जवळ बसणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. एका बेंचवर यापूर्वी संघ बसत असे. आता तीन रांगेत सुरक्षित अंतरावर प्रत्येक जण असेल. त्याचबरोबर गुणलेखकातील अंतरही वाढवण्यात आले आहे. कोर्टवरील दोन्ही बास्केटच्या मागे व्हिडीओ फलक लावण्यात आले आहेत. त्याचा खेळाडूंना त्रास होणार नाही, पण दूरचित्रवाणी प्रक्षेपणात ते दिसतील, याकडे लक्ष देण्यात आले आहे. खेळाडूंना स्वच्छ होऊनच सामन्याच्या ठिकाणी येण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सामन्यानंतर शॉवर हॉटेलवर घेण्यासही सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News