अमेरिकन टेनिस स्पर्धेची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • अमेरिकन टेनिस स्पर्धा एका महिन्यावर आली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

न्यूयॉर्क: अमेरिकन टेनिस स्पर्धा एका महिन्यावर आली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे, त्यानंतरही अमेरिकन टेनिस स्पर्धा ठरलेल्या कालावधीनुसारच म्हणजे 31 ऑगस्टपासून सुरू होईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकन टेनिस स्पर्धेची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी एटीपी तसेच डब्ल्यूटीए स्पर्धाही घेणार आहोत, असे संयोजकांनी सांगितले. नॅशनल टेनिस सेंटरवरील ही स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होईल, असे संयोजकांनी सांगितले. ही स्पर्धा घेताना सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र नेमकी योजना सांगण्यास नकार दिला आहे.
संयोजकांनी खेळाडूंची निवास व्यवस्था स्पर्धेनजीकच्या हॉटेलमध्ये होणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी खेळाडूंना खाजगी घरे घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत न्यूयॉर्क राज्य अमेरिकेतील सर्वात सुरक्षित असल्याचे संयोजक सांगत आहेत. त्यात तथ्य आहे. जूनपासून येथील रुग्ण सातत्याने कमी होत आहेत.
नोवाक जोकोविच, रॅफेल नदाल यांनी अमेरिकनची सराव स्पर्धा समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले आहे, पण अमेरिकन स्पर्धा सहभागाबाबत मौन बाळगले आहे. सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाकाने सहभाग निश्‍चित केला आहे, पण जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ऍश्‍ले बार्तीने नकार दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News