प्रिमियर सोहळ्याला नामवंतांकडून मिळाल्या 'द हंड्रेड बक्‍स'ला शुभेच्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

हा चित्रपट "द हंड्रेड बक्‍स' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. "द हंड्रेड बक्‍स' हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच यावर चित्रपट बनवण्यात आला आहे.

मुंबई : "द हड्रेंड बक्‍स' या चित्रपटाचा प्रिमियर सोहळ नुकताच अंधेरी येथील सिनेपॉल सिनेमागृह येथे पार पडला. यावेळी चित्रपटांतील कलाकारांसोबतच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. अभिनेत्री कविता त्रिपाठी, दिग्दर्शक दुष्यंत प्रताप सिंह, जैद शेख, संगीतकार संतोख सिंह, गायक अनूप जलोटा, कॉमेडियन सुनील पाल, एहसान कुरेशी, राजा हसन, पंकज बेरी, शहजाद खान, साहिल, पवन शर्मा आणि इतर मंडळींनी या प्रिमियरला हजेरी लावली होती.

उपस्थित सर्वांनीच या चित्रपटातील कलकारांना शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट "द हंड्रेड बक्‍स' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. "द हंड्रेड बक्‍स' हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच यावर चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दुष्यंत प्रताप सिंह यांचे आहे, तर वैभव तोमर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेत्री कविता त्रिपाठी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ती मोहिनी हे पात्र साकारत आहे. एक रिक्षाचालक आणि मोहिनी या पात्राभोवती या चित्रपटाची कथा फिरते. याआधी "द हंड्रेड बक्‍स' हा चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News