राज्यातल्या अल्पसंख्याक तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; इथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020

सध्या ही फक्त निवड प्रक्रिया असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या नियमानुसार नंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातल्या अल्पसंख्याक तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; इथे करा अर्ज

राज्य पोलिस दलात अधिक अल्पसंख्याक तरूणांची निवड व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची प्रक्रिया सध्या १४ जिल्ह्यात कोरोनाची परिस्थीती पाहून राबविण्यात येणार आहे. हा राज्य सरकारचा स्तुत्य कार्यक्रम असून अधिक अल्पसंख्याक तरूणांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवावा.

राज्यातल्या १४ जिल्ह्यातील इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू असून इतर जिल्ह्यात सुध्दा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ३० प्रशिक्षणार्थी तर कमाल १०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी निवडले जाणार असल्याची माहिती नुकतीच अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात १२ हजार पोलिस भरती करण्याचा गृह विभागाचा प्रस्ताव आहे. यामध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील तरूणाचा समावेश असावा, यासाठी प्रशिक्षण शिबिर राज्यभर राबविण्यात येणार आहे. सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यातील इच्छूक तरूणांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

ज्या उमेदवारांना प्रशिक्षण हवे आहे, अशा उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किंवा राज्य सरकारकडून निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे. सध्या ही प्रक्रिया १४ जिल्ह्यांमध्ये सुरू असून इतर जिल्ह्यात सुध्दा लवकर सुरू होणार आहे असे नवाब मलिक यांनी सांगितले.

सध्या ही फक्त निवड प्रक्रिया असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या नियमानुसार नंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News