एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दोषी; मंत्रीपद धोक्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्तांचा ठपका

  • लोकायुक्तांच्या अहवालामुळे प्रकाश मेहता अडचणीत

मुंबई : प्रकाश मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका लोकायुक्तांचा चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी हा अहवाल दिला आहे. मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याचे हे प्रकरण होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊड एसआरए प्रकल्पाला मंजूरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता. मात्र प्रत्यक्षात मेहता यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना अवगतच केले नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. 

प्रकाश मेहतांचे मंत्रीपद धोक्यात

लोकायुक्तांच्या या अहवालामुळे प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले असून त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहेत. एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता. जुलै २०१७ रोजी मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा घोटाळा समोर आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली होती. 

विरोधक याप्रकरणी आक्रमक असल्याने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे ६ सप्टेंबर २०१७ रोजी याप्रकरणाचा तपास लोकायुक्तांकडे सोपवण्यात आला. लोकायुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News