पुणे : 'बारावी नंतर करियरचे विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात, त्यातीस कॉमर्स हा करियरचा उत्तम पर्याय आहे. भविष्यात कॉमर्सला उत्तम संधी निर्माण होणार आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबर कॉमर्सचे बीबीए, सीए, सीएस, सीएमए, एमपीएससी, युपीएससी, बॅंक पीओ असे काही आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत, खासजी संस्थेचे प्रॅक्टिकल बि. कॉम, एमबीए असे हमखास नोकरी देणारे कोर्सेस आहे' असे मत प्रॅक्टिकल एज्युस्किलचे सीईओ सन्मित शाह यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी (ता.17) सकाळ माध्यम समूहाच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (YiN) फेसबुक पेजवर करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजिक करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गर्शक म्हणून प्रॅक्टिकल एज्युस्किलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मिक शाह होते. त्यांनी 'कॉमर्स क्षेत्रातील करियरची संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कोरोना काळात पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आहोरात्र कर्तव्य बजावले, नागरिकांना मदत केली, वेळ प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली, त्यामुळे आज नागरिक सुरक्षित आहे. दुसऱ्यांचा जीव वाचवताना पोलिसांनाचं कोरोनाची लागण झाली, त्यात काही पोलिसांना मृत्यू झाला, अशा परिस्थिती पोलिसांनी खचन न जाता पुन्हा धेर्याने कामाला लागली, कामाच्या गराड्यात पोलीसांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे खास पोलिसांच्या पाल्यांसाठी कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बरोजगारी का निर्माण होते?
कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे, मात्र पारंपारिक शिक्षण पद्धतीत कंपन्यांना लागणारे कौशल्य शिकवले जात नाही, त्यामुळे दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, एम. फील, पी. एचडी असे उच्च शिक्षण घेऊही तरुणांना नोकरी मिळत नाही. पारंपारीक शिक्षण बेरोजगारीचे मुख्य कारण आहे.
आधुनिक कोर्सेस
कोर्स: बी. कॉम आणि बीबीए
पात्रता: बारावी पास
प्रशिक्षण संस्था: शासकीय आणि खासजी शिक्षण सस्था
कोर्स कालावधी : 3 वर्षे
वेतन : 45 ते ६० हजार
कोर्स: सीए, सीएस, सीएमए
पात्रता: बारावी
कोर्स कालावधी : 3 वर्षे
प्रशिक्षण संस्था: शासकीय आणि खाजगी संस्था
वार्षिक वेतन : ७ ते २० लाख वार्षिक
कोर्स : फायनन्स रिस्क मॅनेजर (FRM)
पात्रता : पदवी
कोर्स कालावधी : ९ महिने
प्रशिक्षण संस्था : खासजी
वार्षीक वेतन : १० ते १८ लाख
कोर्स : बॅंक पीओ
पात्रता : बी. कॉम
प्रशिक्षण संस्था : खासजी प्रशिक्षण संस्था
वार्षिक वेतन : ५ ते ७ लाख
प्रॅक्टिकल बी. कॉम आणि एमबीए करियरचा राजमार्ग
प्रॅक्टिकल एज्युस्किल शिक्षण संस्थेने दोन कोर्स सुरु केले आहेत. हे कोर्स उमेदवारांना हमखास नोकरी मिळून देणारे आहेत. बी. कॉमच्या पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकवले जाणार आहे, त्यात बँकेची स्लीप भरण्यापासून ते अँडीट करण्यापर्यत शिकवले जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्यक्ष ऑन फिल्ड बॅंकेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या काळात बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना १० ते १२ हजार मानधन दिले जाणार आहे.
कोर्स : प्रॅक्टिकल बी. कॉम
पात्रता : बारावी पास
कोर्स कालावधी : एकूण ३ वर्षे. १ वर्षे शिक्षण आणि २ वर्षे ऑन फिल्ड प्रशिक्षण
प्रशिक्षण संस्था : खासजी
प्रशिक्षण कालावधीत दरमहा मानधन : १० ते १२ हजार
कोर्स : प्रॅक्टिकल एमबीए
पात्रता : पदवी
कोर्स कालावधी : २ वर्षे. ६ वर्षे शिक्षण आणि १८ महिने ऑन फिल्ड प्रशिक्षण
प्रशिक्षण संस्था : खासजी
प्रशिक्षण कालावधीत दरमहा मानधन: १२ ते १५ हजार
सर्टिफीकेट कोर्स
कोर्सचे नाव : बेसिक प्रॅक्टिकल अकाऊंट
कालावधी : 15 दिवस
अभ्यासक्रम शुल्क : विनामुल्य
प्रशिक्षण संस्था : प्रॅक्टिकल एज्युस्किल्स
प्रवेश प्रक्रीया : ऑनलाईन,
उमेदवारांनी ९१२६१९३९९१ या नंबरवर मिस्डकॉल द्यायचा आहे. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेकडून एक गुलल फार्मची लिंक मिसकॉल दिलेल्या नंबरवर पाठवली जाईल. हा गुगल फार्म भरुन सबमीट करायाचा आहे, त्यानंतर प्रवेश प्रक्रीया पुर्ण होईल.