पवईत स्वातंत्र्य दिन साजरा

प्रतिक कांबळे
Saturday, 15 August 2020
  • सध्या कोरोना वायरसने जगभरात थैमान घालत असताना यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी व देशाचा तिरंग्याचा मान म्हणून सवेत सदैव तप्तर असलेल्या कोरोना योद्धांना व स्वातंत्र्य दिनी तीन रंगाचे प्रतिक असलेल्या राष्ट्र ध्वजाला सलामी दिली.

मुंबई :- सध्या कोरोना वायरसने जगभरात थैमान घालत असताना यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी व देशाचा तिरंग्याचा मान म्हणून सवेत सदैव तप्तर असलेल्या कोरोना योद्धांना व स्वातंत्र्य दिनी तीन रंगाचे प्रतिक असलेल्या राष्ट्र ध्वजाला सलामी दिली.

यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब धावारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरकारी नियमांचे पुरेपूर पालन करून सुरक्षित अतंर व तोंडाला मास्क लावून स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

भारत देशाने सरकारी नियमाचे पुरेपूर पालन करून या महाभयंकर कोरोना वायरस ला हरवायला यशस्वी झाल्याने या स्वातंत्र्य दिनी उपस्थितीत रहिवासींना मिठाई व चॉकलेट देत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात वार्ड १२२ अध्यक्ष बौध्दाचार्य एम.डी.वाघमारे,भारतीय बौद्ध महासभा संघटक उत्तम चोपडे,आर.पी.आय (आठवले) विक्रोळी तालुका युवा कार्याध्यक्ष राहुल गच्चे,शेषराव दवणे,प्रकाश गव्हाडे आदी उपस्थितीत होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News