अनुष्का घेतेे कुंभारकामाचे धडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

सध्या अनुष्का शर्मा लंडनमध्ये असून, तिथे एका चित्रीकरणासाठी कुंभारकाम शिकण्याचे क्‍लासेस लावले आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव टॉप अभिनेत्रींमध्ये येत असते. अभिनयाव्यतिरिक्‍त ती इतर कलाही शिकण्याचा प्रयत्न करत असते.

सध्या ती लंडनमध्ये असून, तिथे एका चित्रीकरणासाठी कुंभारकाम शिकण्याचे क्‍लासेस लावले आहेत. या क्‍लासेसला ती दररोज जात असते. याआधी तिने ‘सुईधागा’ या चित्रपटासाठी शिवणकाम, विणकाम या गोष्टी शिकल्या होत्या.

अनुष्का तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत असते. मात्र आता हे कुंभारकाम नक्की कोणत्या चित्रपटासाठी शिकतेय, हे जाणून घेणं रंजक ठरेल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News