पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया 15 जुननंतर ! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • अंतिम वर्षाचे निकाल येणे बाकी
  • प्रक्रियेला यश 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यापीठाची संपूर्ण तयारी झालेली आहे. मात्र, बी.कॉम, बीए आणि बीएसस्सी अंतिम वर्षाचे निकाल लागायचे असल्याने पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया 15 जूननंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठात मागील दोन वर्षांपासून पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. प्रथम वर्षी विद्यापीठाच्या सर्वच विभागांचे प्रवेश केले. मागील वर्षी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्वच पदव्युत्तर जागांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला. राज्यात अशाच प्रकारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर सरकारकडून कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याने प्रक्रिया थंडबस्त्यात पडली.

यावर्षीही आदेश येईल अशी चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे विद्यापीठस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बीए, बी.कॉम आणि बीएसस्सी अभ्यासक्रमांचे निकाल यायचे आहेत. तिन्ही शाखेत विद्यार्थ्यांची संख्या आणि बऱ्याच विषयांचा समावेश असल्याने निकाल लावण्यास उशिर होत असतो. तीन्ही शाखांपैकी बी.कॉमच्या अंतिम वर्षाचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल 5 जूनपर्यत येण्याची शक्‍यता आहे. मात्र, बीए आणि बीएसस्सीचा निकालास उशिर होत असल्याने प्रक्रिया 15 जूननंतरच सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. 

प्रक्रियेला यश 
विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन वर्षांच्या प्रवेशावर नजर टाकल्यास विज्ञान शाखेत प्रवेश हाऊसफुल तर कला शाखेत जागांच्या तुलनेत कमी अर्ज आल्याची स्थिती दिसून आली. यात प्रामुख्याने एमए अभ्यासक्रमातील 12 हजार 590 जागांपैकी 3 हजार 704 जागांसाठीच अर्ज आले आहेत. याउलट एमएसस्सीच्या 1 हजार 966 जागांसाठी 3 हजार 764 अर्ज आले होते. विशेष म्हणजे प्रक्रियेदरम्यान कुठलीच गडबड न झाल्याचे दिसून आले.
 

एमए 12, 500
एमएसस्सी 2000
एमसीएम 1,200
एमएसडब्ल्यू 100 
कला 40,000 
वाणिज्य 30,000 
विज्ञान 35,000
होमसायन्स 400
होम इकॉनॉमिक्‍स 500

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News