. पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

मुंबईत जुलैमधील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली. गुरुवारीही कोरडेच वातावरण राहण्याची शक्‍यता असून मुंबईतील तापमान 34 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई: मुंबईत जुलैमधील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली. गुरुवारीही कोरडेच वातावरण राहण्याची शक्‍यता असून मुंबईतील तापमान 34 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळतील. शनिवारपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची हीच परिस्थिती राहाणार आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत कुलाबा येथे आज कमाल 32.2 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर सांताक्रूझ येथे 32.8 कमाल आणि 26.2 किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील 48 तास कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 28 अंशांपर्यंत राहील. सांताक्रूझ येथे या महिन्यातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी 36.2 अंश तापमान नोंदवण्यात आले होते. 1960 नंतरचे हे सर्वाधिक तापमान आहे. पावसाने गेल्या काही दिवसांत ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ होत असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुढील दोन दिवसदेखील तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News