ओळख एनएसएसचीः डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी महिला विद्यापीठ, एनएसएस कार्यक्रम समन्वयक
मोकळीक मिळाल्यामुळे मुलींमध्ये सकारात्मक बदल होतो
डॉ नितीन सदानंद प्रभू तेंडुलकर हे एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये एनएसएस प्रोग्रॅम कॉर्डीनेटर म्हणून २०१३ पासून कार्यरत आहेत. महिला किती उत्तम प्रकारे समाजात काम करू शकतात या बाबतची माहिती डाॅ. तेंडुलकर यांनी यिनबझशी संवाद साधताना दिली
सुरवातीला माझी अपाॅईंटमेंट डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट, स्टुडंट वेलफेरमध्ये झाली. एसएनडीटीचे मुख्यालय मुंबईला असून तीन कॅम्पस आहेत. चर्चगेट, पुणे आणि जुहूतारा रोड. एसएनडीटी हे एकमेव महिला विद्यापीठ आहे, ज्याची विद्यालये वेगवेगळ्या सात राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये एसएनडीटीची विद्यालये आहेत. एकूण नऊ झोन आहेत. मुंबई ए - बी, कोकण, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात सुद्धा एनएसएसची युनिट्स आहेत. त्यामुळे आमची काम करण्याची उद्दिष्टे, पद्धत वेगळी आहेत. तिथल्या समस्या, उपलब्ध साधने, तिथला समाज यानुसार आम्ही काम करण्याची उद्दिष्टे ठरवली आहेत.
आदिवासी भागांमध्ये लोकांना माहित नव्हतं की कोरोना काय आहे? कशी काळजी घ्यायची? त्यासाठी आदिवासी पाड्यावर जाऊन तिथल्या आशाताई, नर्सेस, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत आदी येथे जाऊन जनजागृती केली. शहादा, वाजर्श्वरी भागात मुलींनी मास्क बनवून वाटले. झूमच्या माध्यामातून प्रोग्रॅम ऑफिसर्सला माहिती दिली. एकूण ६० युनिटमध्ये १०,००० विद्यार्थीनी संख्या आहेत. विद्यापीठाने ठरवलेली काही उद्दिष्टे आहेत. वूमेन्स हेल्थ अँड हायजिन, वूमन एम्पॉवरमेंट, वॉटर मॅनेजमेन्ट, स्किल डेव्हलपमेंट आणि स्वच्छ भारत अभियान या चार मुख्य उद्दिष्टांवर काम करत आहोत. प्रोग्रॅम ऑफिसर महिला आणि पुरुष दोन्ही आहेत.
व्हाॅट्सअॅपवर माहितीसाठी ग्रुप बनवून उपलब्ध साधनातून मास्क कसा बनवू शकतो याची माहिती दिली. या काळात घरचे देखील मुलांना बाहेर सोडायला तयार नव्हते, तेव्हा डिजिटल माध्यमांचा वापर केला. धन्यवाटप केलं. यूट्यूब चॅनेल बनवलं आणि आपल्या मुलींनी केलीली कामे, प्रेरणादायक गोष्टी त्या माध्यमातून प्रसारित केल्या. आमच्या होम सायन्स कॉलेजने काही फॉर्म्युले दिले. कोणते पदार्थ बनवून खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते, काय खाऊ नये हे सांगितले. आपल्याकडे अॅपरेल डिझाइन कोर्सेस आहेत. त्या मुलांनी मास्क बनवण्याचे ट्रेनिंग दिले.
एक प्रोजेक्ट आम्ही केला होता. प्रत्येक महाविद्यलयाने आपला विडिओ बनवायचा आणि प्राचार्या, प्रोग्राम ऑफिसर, कॉलेजचे विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं. आणि गांभीर्य लक्षात आणून देण्याकरता हे विडिओ पालकांना पाठवायचे. डिजिटल माध्यमातून पोस्टर, रांगोळी स्पर्धा घेतली. क्रिएटीव्ह संदेश देण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर केला, म्हणी, वाक्प्रचार, काव्यपंक्तींचा वापर केला. या काळात मेंटल हेल्थ पण गरजेची होती. पण लोकांना एकत्रित येता येत नव्हतं. म्हणून सायकॉलॉजी, चाईल्ड सायकॉलॉजी आणि एनएसएस विभागाने मिळून मेंटल हेल्थवर एक टेस्ट तयार केली. सर्व विद्यापीठांमध्ये पाठवून चाचणी घेण्यात आली आणि लगेच रिझल्ट दिसून आले. निराश असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे या वर उपाय सांगितले. कोरोनाबद्दलचं ज्ञान तपासण्यासाठी सुद्धा चाचणी घेण्यात आली.
लोकांकडे या काळात वेळ खूप होता आणि तो वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता. त्या दृष्टीने पण आम्ही टेस्ट घेतल्या. त्या दिवसात झालेली चांगली गोष्ट सांगा किंवा फोटो पाठवा असे कार्यक्रम डिजिटल मोड वर केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत सेल्फ इम्मुनिटी चेक म्हणून राधे फाउंडेशनशी करार केला. एक सॉफ्टवेअर बनवून प्रत्येक मुलीला ३०० लोकांपर्यंत पोहचण्याचं लक्ष्य दिले. ही टेस्ट परत ६० दिवसांनी करायची आणि यात फळं कुठली खायची, कुठला आहार घ्यायचा याबद्दल माहिती दिली आहे. गावात काही ठिकाणी मुलं जातात पण काही ठिकाणी पोहचू शकत नाहीत. तिथं सोशल मीडियाद्वारे पोहचणं हा उद्देश आहे. फेसबुक पेज काढून डब्ल्यूएचओने दिलेली नवीन माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करत आहोत.
मुलींना ग्रामीण भागात जास्त बाहेर पडायला मिळत नाही, पण एनएसएस मुळे त्या मन लावून काम करतात, कॅम्पला जातात आणि त्यांना तिथं मोकळ वातावरण मिळत. पालकांनाही विश्वास ठेवून त्याना मोकळं वातावरण दिल पाहिजे. एनएसएस मुळे त्यांना खुप मोकळीक मिळते. एनएसएसमुळे त्यांच्यामध्ये धाडस आणि सकारात्मक बदल झाल्याचे मनोगत मुली नेहमी व्यक्त करतात.