पॉर्नने घेतला १४ वर्षीय मुलाचा जीव...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

पॉर्न पाहण्याचा अतिरेक एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना नागपूर मध्ये घडली आहे. नागपूरमधील १४ वर्षीय मुलाचा मोबाईलच्या अतिवापरामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूर - पॉर्न पाहण्याचा अतिरेक एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना नागपूर मध्ये घडली आहे. नागपूरमधील १४ वर्षीय मुलाचा मोबाईलच्या अतिवापरामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव वंश राजू इमला असं आहे. तो आता आठवीतील विधार्थी होता, आई एका खाजगी कंपनीत नोकरीला होती. वंश घरी आपल्या आजी व आई बरोबर राहत होता. 

काही दिवसांपासून वंश अस्वस्थ होता. प्रत्येक क्षण मोबाईल त्याच्या हातात असायचा. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचे लक्ष लागत नसे. वंशला मोबाईलचे व्यसन लागले होते म्ह्णून काही दिवसापूर्वी वंशाच्या आईने वंशाचा हातून मोबाईल घेतला. त्यामुळे वंश खूप अस्वस्थ झाला होता. आई घराबाहेर निघताच वंशाने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी जेव्हा या गोष्टीचा तपास केला तर तपासमधून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे वंशाला मोबाइलबरोबरच पॉर्न पाहण्याचे देखील व्यसन लागले होते. घराच्या भीतीमुळे तो अस्वस्थ झाला होता, आणि यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलेले हे समोर आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News