मेकअप आर्टिस्ट पूनम भोईर चा पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 21 December 2019

पनवेल : सध्या मेकअप क्षेत्रात प्रचंड प्रगती होत आहे. नवनवीन संधी या क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. पनवेलमधील मेकअप आर्टिस्ट पूनम भोईर यांनी पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकतेच त्यांना ‘इंडिया एक्‍सलेन्स अवॉर्ड २०१९’ मध्ये अभिनेत्री बिपाशा बासू यांच्या हस्ते ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बंगळुरुमधील ताज हॉटेलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. पूनम भोईर यांना सप्टेंबरमध्ये पॅरिस येथे झालेल्या ओएमसी वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. वर्ल्ड कपमध्ये त्यांनी आपली कला सादर करून भारताचा झेंडा अटकेपार नेला. एवढेच नाही तर जूनमध्ये एआयएचबीए या मेकअपच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये त्यांना तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पूनम यांनी आपल्या कर्तृत्वाने पनवेलचे नाव पंचक्रोशीत नेले आहे. पूनम भोईर यांचा पनवेलमध्ये पूनम ब्रायडल स्टुडिओ आहे. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News