निसर्गाला माणसांशी जोडणारा पूल

युवराज पाटील
Friday, 7 June 2019

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गेलेला माणूस सह्याद्रीच्या प्रेमात पडत नाही, असे होत नाही. तो सह्याद्रीत एक वेळ गेला की पुन्हा पुन्हा तिथे जातो. छत्रपती शिवरायांनी अतिशस सुक्ष्मपणे विचार करुन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील चिवट मावळ्यांना घेवून सह्याद्रीच्या खंबीर पाठींब्यावर आपलं स्वराज्य उभे केलं होतं.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गेलेला माणूस सह्याद्रीच्या प्रेमात पडत नाही, असे होत नाही. तो सह्याद्रीत एक वेळ गेला की पुन्हा पुन्हा तिथे जातो. छत्रपती शिवरायांनी अतिशस सुक्ष्मपणे विचार करुन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील चिवट मावळ्यांना घेवून सह्याद्रीच्या खंबीर पाठींब्यावर आपलं स्वराज्य उभे केलं होतं. सह्याद्रीतच स्वराज्य का स्थापन केलं, याला अनेक कारणे होत. त्यातलं सर्वात महत्वाच कारण इथल्या सह्याद्रीच्या प्रचंड कडा शत्रुच्या छातीत धडकी भरवणाऱ्या आणि किल्ल्यांची चढाई आणि किचकट वाटा शोधण्यातच निम्मी ताकद शत्रुची खर्ची होत असे, आणि सह्याद्रीच्या चुकार वाटा, गमिनीकावा यामुळे शत्रुची भंबेरी उडून जायची. कधी ऐकदा सह्याद्री सोडून सपाट प्रदेशात जावू असे त्यांना व्हायचे म्हणून सह्याद्रीतील स्वराज्याचे किल्ले औरंगजेबाच्या मरणापर्यंत त्याच्या हाती लागले नाहीत. अशा या पार्श्वभमुळे जावलीचे खारे, वाईचे खोरे आणि महाबळेश्वर सामान्य पर्यटकांची आणि धाडशी गिर्यारोहकांची पसंदीचे ठिकाण आहेत.

जावली खोरे फिरायचे म्हटले तर पर्यटकांना सर्वात मोठा अडसर हा कोयना नदीच्या विस्तीर्ण पाण्याचा आणि कोयना धरणाच्या जवळपास 50 किलोमीटर मागे पसरलेल्या जलाशयाचा, हा जलाशय एकतर होडीने ओलांडणे किंवा पन्नास ते साठ किलोमिटर लांब पल्याचा रस्ता स्विकारणे असा पर्याय पर्यटकांसमोर असायचा, महाबळेश्वर मधून 22 किलोमिटर अंतरावर कोयना नदीच्या काठी कट्रोशी हे गाव आहे… त्या गावापासून पुढे नदीचे पाणी ओलांडून गेले की, सह्याद्रीच्या खऱ्या सौंदर्याचे छाटा, सह्याद्री जगाच्या नकाशावर जैवविविधतेत का अव्वल आहे याची उत्तर देणाऱ्या वनस्पती, पशु, पक्षी किटकं, सुक्ष्‍म अनेक प्रजाती पाहून हरखून जायला होतं, या निसर्गाबरोबर ज्या जावलीच्या मोरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शत्रुत्व ओढून घेतलं. 

छोटेखानी युद्ध करुन छत्रपती शिवरायांना जावली खोरं मोऱ्यांच्या ताब्यातून घ्यावं लागलं,त्या मोऱ्यांचा वाडा याच जलाशयाच्या पैलतीरी आहे, मकरंदगड, उत्तरेश्वर मंदिर,चकदेव शिडी हे ऐतिहासिक पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या गोष्टी इथे आहेत. आता या सर्व ठिकाणी जाण्यासाठी पाणी ओलांडून जाण्याची गरज लागत नाही. कारण आता महाराष्ट्र शासनाने जो सेर (पुल ) बांधला आहे, तो या भागातील जनतेच्या, पर्यटकांच्या सांस्कृतिक देवाण घेवाणीच्या मधल मोठा देुवा बनला आहे. कोट्रोशी ते रेणोशी दरम्यान बांधलेला हा 275 मिटर लांबीचा पुल पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगात सौंदर्यात भर टाकणारा ठरला आहे. हा पर्यटन, सांस्कृतीक देवाण-घेवाण वाढविणारा सेतू पाहायला जात यावे यासाठी त्याचा लेखाजोखाही आम्ही देत आहोत.

कोयना धरणाचे जलाशय महाबळेश्वर तालुक्यापर्यंत आहे. या तालुक्यातील कोट्रोशी व रेणोशी ही दोन गाव या जलाशयाच्या बाजूस आहे. या दोन्ही गावे या सोबत जोडलेली अनेक गावे येण्या जाण्यासाठी बोटींचा वापर करत होतो ही गावे कोयना धरणाच्या जलाशयाच्या दुर्गम भागात असल्याने महाळेश्वर तालुका जवळ असूनही अनेक अडचणींवर मात करुन त्यांना या तालुक्यात जावे लागत होते. अतिशय दुर्गम भाग असल्याने मुलभूत सोयी-सुविधा लवकर उपलब्ध होत नव्हत्या. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्रोशी ते रेणोशी दरम्यान प्रजिमा-17 ते इजिमा-26 रस्त्याला जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. हा पुल इथल्या नागरिकांच्या जगण्याचा नवा पुलचं तयार झाला अशा भावना परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविल्या आहेत.

पुल बांधकामासाठी 2686.31 लक्षास तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. 50.00 मि. लांबीचा 1 गाळा व 45 मि.लांबीचे 5 गाळे आहेत. कोट्रोशी बाजूस 900 मि. व रोणोशी बाजूस 1500 मिटर आहे. या कामाची किंम 2874 लक्ष असून मुख्य पुलाचे काम पूर्ण झाले असून पोहोच रस्त्याचे मातीकाम, खडीकरण, डांबरीकरण कामे पूर्ण झाली आहेत व हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.

या पुलाची लांबी 275 मिटर आहे. पुलाची रुंदी 12.00मिटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस 1.50 मिटर रुंदीचा पदचारी मार्ग व 7.50 मीटरवी धावपट्टी आहे. नदीतळापासून पुलाची उंची सुमारे 32.00 मिटर आहे. पोहोच मार्ग रेणोशी बाजुने 1500 मिटर व कोट्रोशी बाजूने 900 मिटर आहे.

पुलामुळे होणार फायदे

  • पर्यटनाच्या दृष्टीने विकास : या भागातील मकरंदगड, उत्तेश्वर मंदिर, पर्वत, जावळीच्या मोरेंचा जुना वाडा, चकदेव शिडी येथील निसर्गाचे अभूतपूर्व दर्शन, तसेच पर्यटकांना जंगल सफारी व ट्रेकींगचा आनंद घेण्यासासाठी सुमारे 50 कि.ती. अंतराची बचत होणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग क्र.17 (मुंबई ते गोवा) व राष्ट्रीय महामार्ग क्र.4 (पुणे-बेंगलोर) यांना जोडणारा नवीन पर्यायी रस्ता निर्माण झाला आहे.
  • सद्य:स्थितीत दक्षिणेकडून व कोकणातील येणारे पर्यटक या मार्गाचा अवलंब करीत आहे तसेच पर्यटकांना कमी वेळेत समुद्र किनारी जाण्यासाठी एक चांगला पर्याय मार्ग उपलब्ध झाला आहे. या पुला मुळे महत्वाचे म्हणजे आपत्ती अडचणीच्या वेळी जलाशयाच्या पलीकडील जनतेस मुलभूत सोई-सुविधा पुरविण्यासाठी खूप मोठी मदत होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News