संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले की...

यिनबझ टीम
Saturday, 18 January 2020

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवरील वक्तव्य मागे घेतलं असलं,तरी सध्या हा वाद सुरूच आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आपलं मत मांडलं आहे, त्यांच्या मते संजय राऊत यांनी हे बोलणे टाळले पाहिजे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या गॅंगस्टर करीम लाला यांना भेटत असत, हे वक्तव्य संजय राऊत यांनी करायला नको पाहिजे होतं, असं मत शरद पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना मांडले.

खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिलेल्या एका मुलाखतीमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती, त्यांच्या मते इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटत असत. त्यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने तीव्र प्रतिक्रिया देखील दिली होती. मात्र, नंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना अशी वादग्रस्त विधाने करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की,  1972 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान, हाजी मस्तान माझ्या बाजूला बसला होता, अशा बातम्या छापल्या गेल्या, पण मला त्याप्रकारची कोणतीच माहिती नव्हती.

संजय राऊत ज्या वेळेची गोष्ट करत आहेत,  त्यावेळी ते किंवा त्यांचा कोणताच नेता सत्तेत नव्हता, त्यावेळेस मी सत्तेत होतो, त्यामुळे मला या सर्व लोकांपेक्षा थोडे अधिक माहित आहे, त्यावेळेस असं काहीच घडलं नव्हतं.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News