असेचं संपवणार हे राजकारण देशाला

मदन साबळे
Tuesday, 4 June 2019

सध्याच्या युगामध्ये झालेले खूप मोठे बदल जगाला संपुष्टात आणण्याची लक्षणे निर्माण झालेली दिसताहेत. आपण भारतामध्ये म्हणजेच कृषिप्रधान देशांमध्ये राहतो खरे तर मला खूप अभिमान वाटतो की मी या महान अशा देशात जन्माला आलो आहे.

सध्याच्या युगामध्ये झालेले खूप मोठे बदल जगाला संपुष्टात आणण्याची लक्षणे निर्माण झालेली दिसताहेत. आपण भारतामध्ये म्हणजेच कृषिप्रधान देशांमध्ये राहतो खरे तर मला खूप अभिमान वाटतो की मी या महान अशा देशात जन्माला आलो आहे. मात्र आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण आणि, सर्व धर्मिय एकत्र कसे जगतो आहे हे तुम्हाला आणि मला चांगलेच ठाऊक आहे. देशाच्या विकासासाठी काम करण्याची संकल्पना प्रत्येकाच्या मनात राबली गेली पाहिजे, असे मला तरी वाटते. राजकारणाचा वापर सध्या कसा सुरू आहे, हे प्रत्येकालाच माहीत आहे. परंतु यामध्ये सामान्य नागरिकाला खूप त्रास होतो. म्हणून राजकारणाचा वापर हा नुसता राजकारणापुरता न करता लोककल्याणासाठी व्हावा.

संपूर्ण जगामध्ये लोकशाही आहे. मग या लोकशाहीमध्ये का समाजाचे हित पाहिले जात नाही. याचे कारण असे की आपल्याला चांगल्या विचारांची कमतरता आहे. ती कमतरता भरुन निघाली तर नक्कीच आपला देश सुखसमृद्धी आणि उज्वल होईल आपल्याकडे माणसे राजकारण हे देशासाठी व एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठीच करतात. पण तसे न होता विकासाच्या विचारांचे भांडण असावे. विकास कसा करता येईल यासाठी राजकारण करणे गरजेचे आहे. परंतु, हल्लीच्या राजकारणामुळे संबंध देश भरडला जात आहे. या देशातील जनता ही अडचणीत येऊन त्यांचे हित जोपासणे अवघड झाले आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती धर्मांना घेऊन तयार झालेला आहे. परंतु, प्रत्येकजण स्वतंत्र कारभार करू लागला तर देशाचे तुकडे होतील आणि आपला देश पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची भीती वाटते. 

म्हणूनच देशाच्या आत्ताच्या लोकसंख्येनुसार देशातील सत्तेत असलेल्या सरकारने तशा उपाय-योजना कराव्यात. मग कोणताही मोठा बदल असो तो करावा लागला तरी चालेल. एक सांगावेसे वाटते की सरकार कोणाचेही असो म्हणजेच कुठल्याही पक्षाचे असो. लोकशाहीतील आपण ज्यांना राजे म्हणतो ते म्हणजे मतदार आहेत. मग हे सरकार कोणाच्या मालकीचे किंवा पक्षाचे कसे असू शकते. मग कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी लोकशाहीतील मतदार राजांचे सरकार आहे. म्हणून मतदार म्हणतील तशा पद्धतीने कामे करून देणे हे सरकारचे, सत्ताधार्‍यांचे कर्तव्य असायला हवे. 
 
आपल्या देशातील तरुण वर्ग हा देशाचे भवितव्य घडवणारा एक मुख्य वजीर म्हणून ओळखला जातो पण या तरुण वर्गाने पाश्‍चात्य संस्कृतीचा जास्त विचार न करता छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभूराजांच्या विचारांवर चालले तर कोणाची हिंमत होणार नाही की आपल्या देशाला वाकड्या नजरेने बघण्याची. थोर पुरुषांचे विचारांवर जर देश चालला तर विकास हो होणारच. लोकशाहीतील मतदार राजाच्या स्वप्नातील विकास होईल. एवढेच नाही तर जगाला हेवा वाटावा, असा आपला देश अव्वल बनू शकेल एवढेच.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News